Sonakshi Sinha Reacts On Being About Marriage Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonakshi Sinha About Marriage : दबंग गर्ल आणि झहीरच्या लग्नावरून सोशल मीडियात उलटसुलट चर्चा, सोनाक्षी सिन्हाने एका वाक्यात उत्तर दिलं

Sonakshi Sinha Reacts On Being About Marriage : नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षी सिन्हाने लग्नाच्या चर्चांबद्दल "एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते." असं ती म्हणाली आहे.

Chetan Bodke

'हिरामंडी' वेबसीरीजमुळे प्रकाशझोतात आलेली सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे. सध्या कालपासून सोनाक्षीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. सोनाक्षी आणि तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बाल सोबत येत्या २३ जूनला मुंबईमध्ये लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे. नुकतंच अभिनेत्रीने लग्नाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिलेली आहे. लग्नाच्या चर्चांबद्दल मी एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते. असं ती स्वत: मुलाखतीमध्ये म्हणाली आहे.

आयदिवा (IDiva) ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनाक्षी सिन्हाने सांगितले की, "मला अनेकदा लग्नाबद्दल प्रश्न विचारलेले आहे. आता मी या प्रश्नांकडे सहसा जास्त लक्ष देत नाही. मी हे सर्व प्रश्न एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, माझ्यालग्नाविषयी कोणालाही कसलं घेणं- देणं नसावं. तर दुसरी गोष्ट म्हणजे, मी माझा लाईफ पार्टनर पुर्णपणे माझ्या चॉईसने शोधणार आहे, त्यामुळे लोकांना माझ्या लग्नाबद्दल इतका का विचार आहे, हे मला कळत नाही."

"माझ्या लग्नाचा विचार जितके माझे आई- वडिल करत नाही, त्यापेक्षा जास्त बाहेरचे लोकं विचारतात. पण मी त्यांचा विचार जास्त विचार करत नाही. माझ्या लग्नाची आता मला इतकी सवय झालेली आहे ना त्याचा मला सहसा जास्त त्रासही होत नाही. जर लोकं उत्सुक असतील, त्याला मीही काही करु शकत नाही." अशी प्रतिक्रिया सोनाक्षी सिन्हाने मुलाखतीमध्ये दिली आहे. मुलीच्या लग्नाच्या चर्चांच्या उधाणावर दिग्गज अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

दिग्गज अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, "आजकालची मुलं तसंही आई- वडिलांचं ऐकतातच कुठे ? ते कोणताही निर्णय आई- वडिलांना फक्त सांगतात. आम्हाला आमच्या मुलीवर पुर्णपणे विश्वास आहे. ती कधीच कोणताही निर्णय आम्हाला न सांगता घेत नाही. माध्यमांमध्ये मी वाचल्याप्रमाणे, जर तिने मला आणि माझ्या पत्नीला विश्वासात घेतलं तर आम्ही नक्कीच तिला आणि तिच्या होणाऱ्या पतीला आशिर्वाद देईल."

मीडिया रिपोर्टनुसार, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचं लग्न २३ जूनला होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाला दोघांचेही बेस्ट फ्रेंड्स आणि जवळचे नातेवाईकांव्यतिरिक्त ‘हीरामंडी’च्या सर्व कलाकारांना लग्नासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trikadasha Yog: आज 18 वर्षांनंतर बुध-यम बनवणार त्रिएकादश योग; करियरमध्ये होणार चांगली प्रगती, पैसाही मिळणार

Lucky zodiac signs: कार्तिक शुक्ल अष्टमीचा शुभ संगम; या राशींसाठी धार्मिक कार्य, मानसिक स्थैर्य आणि आर्थिक लाभाचे संकेत

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

SCROLL FOR NEXT