Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Register Marriage Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonakshi And Zaheer Register Marriage : सोनाक्षी- जहीर लग्नात सप्तपदी घेणार नाहीत ?, अभिनेत्रीच्या बेस्ट फ्रेंडने सांगितलं कसं होणार लग्न

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Register Marriage : सोशल मीडियासह सर्वत्र सध्या सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या २३ जूनला हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे.

Chetan Bodke

सोशल मीडियासह सर्वत्र सध्या सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या २३ जूनला हे कपल लग्नबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच सोनाक्षी आणि जहीर हे दोघेही येत्या २३ जूनला रजिस्टर मॅरेज करणार असून नंतर रिसेप्शन पार्टी ठेवणार असल्याची माहिती मिळत आहे, जाणून घेऊया सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाबद्दल...

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, जहीर आणि सोनाक्षी येत्या २३ जूनला रजिस्टर्ड मॅरेज करणार आहेत. त्यानंतर २३ जूनलाच संध्याकाळी रिसेप्शन होणार आहे. रिसेप्शनला दोघांचेही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी रिसेप्शन पार्टीला उपस्थिती दर्शवणार आहेत. त्यासोबतच 'हिरामंडी' वेबसीरीजचीही सर्व स्टारकास्ट यावेळी लग्नाला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. ही त्यांची रिसेप्शन पार्टी मुंबईतच होणार आहे.

सोनाक्षी सिन्हाच्या एका मित्राने झुमला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, "मला सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाचे आमंत्रण मिळाले आहे. या कपलचं लग्न २३ जूनला संध्याकाळी असणार आहे. पण त्या पत्रिकेमध्ये, लग्नाविषयी कोणतीही माहिती नाही. कपलने आधीच रजिस्टर्ड मॅरेज केलेले असेल किंवा २३ जूनला सकाळीस हे कपल रजिस्टर्ड मॅरेज करेल. पण हे लग्नाचं कोणतंही ग्रँड सेलिब्रेशन करणार नाही, फक्त साधी सिंपल पार्टी होईल."

मिळालेल्या माहितीनुसार, रिसेप्शन पार्टीसाठी कुटुंबियांव्यतिरिक्त सोनाक्षी आणि जहीरचे जवळचे मित्र असणार आहे. अभिनेत्री हुमा कुरेशी, आयुष शर्मा यांनाही आमंत्रण मिळालं आहे. त्याशिवाय 'हिरामंडी'तील सर्वच कलाकारांनाही लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं आहे. सोनाक्षी आणि जहीर एकमेकांना सलमान खानच्या एका पार्टीमध्ये भेटले होते. २०२२मध्ये रिलीज झालेल्या 'डबल एक्स एल' चित्रपटामध्ये दोघांनीही एकत्र काम केले होते. सध्या लग्नाची जोरदार चर्चा होत असून अद्याप सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाविषयी अधिकृत माहिती मिळालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT