Sonakshi Sinha- Zaheer Iqbal Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonakshi Sinha- Zaheer Iqbal: सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाला एक महिना पूर्ण, फिलिपिन्समध्ये सेलिब्रेशन; फोटो पोस्ट करत म्हणाली...

Sonakshi Sinha- Zaheer Iqbal One Month Anniversary Celebration: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला २३ जुलै रोजी एक महिना पूर्ण झाला. यानिमित्त त्यांनी फिलिपिन्समध्ये सेलिब्रेशन केले आहे. याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Siddhi Hande

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हाने २३ जून २०२४ रोजी झहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता लग्नाच्या एका महिन्यानंतर सोशळ मीडियावर त्यांच्या हनिमूनचे फोटो पोस्ट केले आहेत. सोनाक्षी आणि झहीर सध्या त्यांची One Month Anniversary सेलिब्रेट करत आहेत.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल त्यांनी लग्नाला एक महिना झाल्यामुळे त्यांच्या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. सोनाक्षी आणि झहीर फिलिपिन्समध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.या दोघांनी फिलिपिन्समधील रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनाक्षीने फिलिपिन्समधील रिसॉर्टचे, स्विमिंग पूलमधील, जेवणाचे असे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यावर एकदम हटके कॅप्शनदेखील दिले आहे. 'आम्ही आमचा लग्नानंतरचा पहिला महिन्याच्या वाढदिवसाचे सेलीब्रेशन केले आहे. यानिमित्त आम्ही आम्हाला सर्वात जास्त गरज असलेली गोष्ट केली ती म्हणजे रिकव्हर. आम्ही फिलिपिन्समध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या एका आठवड्याने आम्हाला शिकवले की, आयुष्यात निरोगी असणे किती महत्त्वाचे आहे. आम्ही आमच्या शरीराची,मनाची काळजी घेतली. रोज सकाळी निसर्गाच्या सानिध्यात उठलो, उत्तम जेवण, वेळेवर झोप आणि डिटॉक्स ट्रिटमेंट घेतली. यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे. या सगळ्यांसाठी आमच्या मित्रांचे खूप खूप आभार', असं म्हणत तिने तिच्या मित्रांना टॅग केले आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी आणि झहीरने एकदम साध्या पद्धतीने लग्न केले होते. याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

Sunita Ahuja: ४० वर्ष सोबत राहणं सोपी गोष्ट...; गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफावांवर पत्नी सुनीता आहुजा स्पष्टचं बोलली

Maharashtra Live News Update: शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नवऱ्याने केली होणाऱ्या बायकोची हत्या

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्याच्या गणेशोत्सवातील पहिला मानाचा कसबा गणपतीचं विसर्जन

बीडवरून नगरला फक्त ४० रूपयात, रेल्वे कोणकोणत्या स्थानकात थांबणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT