Shraddha Kapoor  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shraddha Kapoor : 'स्त्री २'नंतर आता 'स्त्री ३' चा धुरळा उडणार; श्रद्धा कपूरने केला मोठा खुलासा, म्हणाली...

Stree 3 Update : 'स्त्री २'च्या घवघवीत यशानंतर आता 'स्त्री ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे.

Shreya Maskar

'स्त्री २'नं (Stree 2) बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले आहे. 'स्त्री २' १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार रावच्या (Rajkummar Rao) जोडीने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली.

आता 'स्त्री २' नंतर सर्वत्र 'स्त्री ३' ची चर्चा पाहायला मिळत आहे. स्वतः श्रद्धा कपूरने 'स्त्री ३' विषयी मोठी अपडेट दिली आहे.

'द इंडियन एक्स्प्रेस' च्या 'स्क्रीन मॅगझिन'च्या अनावरण सोहळ्याला श्रद्धाने 'स्त्री ३' विषयी मोठा खुलासा केला आहे. यावेळी श्रद्धाला 'स्त्री ३' विषयी विचारल्यावर ती बोली की, "स्त्रीचे दिग्दर्शक अमर सर मला म्हणाले की 'स्त्री ३' च्या (stree 3) चित्रपटासाठी कथा मिळाली आहे. त्यामुळे मी स्वतः चित्रपटाची कथा ऐकण्यास उत्सुक आहे. काही तरी भन्नाट आहे. यामुळे मी देखील 'स्त्री ३'साठी खूप उत्सुक आहे. "

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री श्रद्धा कपूरचा मोठा चाहता वर्ग आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या प्रत्येक फोटो पाहून चाहते घायाळ होतात. श्रद्धाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिच्या चित्रपटातील अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. तिचे चाहते 'स्त्री ३' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'स्त्री २' हा हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत 'स्त्री २' हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाहेरगावच्या ट्रेनवर M1 बोर्ड असा बोर्ड का असतो? काय आहे याचा नेमका अर्थ?

Karjat -Jamkhed Constituency: कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे; भाजप आणि शरद पवार गटात अटीतटीची लढत

Maharashtra News Live Updates: शरद पवार नागपूर विमानतळावरून हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे दाखल

Nashik Politics: '5 लाख द्या नाही तर पराभव करेन'; शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराकडे खंडणीची मागणी

IPL 2025: मोहम्मद कैफ, युवराज सिंगसह तेंडुलकरही लिलावाच्या रिंगणात! Base Price किती? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT