Shraddha Kapoor on Marriage Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shraddha Kapoor: 'वो स्त्री है..', लग्नाच्या प्रश्नावर श्रद्धा कपूरने दिलं भन्नाट उत्तर

Shraddha Kapoor on Marriage: श्रद्धा कपूर लग्न कधी करणार, असा प्रश्न तिच्या अनेक चाहत्यांना पडला आहे. यावर तिने पहिल्यांदाच आली प्रतिक्रिया दिली आहे.

Rutuja Kadam

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या क्युट अदांनी कायमच चाहत्यांना घायाळ करते. 'स्त्री' या सिनेमात धमाकेदार अभिनय केल्यानंतर चाहत्यांना दुसऱ्या भागाची प्रतिक्षा होती. ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कारण, स्त्री-2 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं प्रमोशन संपूर्ण टीम ठिकठिकाणी करत आहे.

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'स्त्री 2' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यानिमित्त चित्रपटाच्या टीमकडून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान, सर्वांच्या नजरा श्रद्धावरच खिळून राहिल्या होत्या. लाल साडी परिधान करुन आलेल्या श्रद्धाने सर्वांची मने जिंकली. यादरम्यान श्रद्धा तिच्या लग्नाबाबत बोलली. जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आले की, आज तू नववधूची वेशभूषा करून आली आहेस, तेव्हा तू खऱ्या आयुष्यात कधी नववधू होणार आहेस? पण श्रद्धा खरच किती हजरजबाबी आणि हुशार आहे ही तिने तिच्या उत्तरातून स्पष्ट केले. स्त्री सिनेमातील डायलॉगमधून तिने याचं हटके उत्तर दिले आहे. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हारल होत आहे.

'स्त्री 2' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी श्रद्धा कपूरला लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिने चित्रपटातील डायलॉग ऐकवला. ती म्हणाली, ''वो स्त्री है, उसे जब दुल्हन बनना है वो बनेगी.'' तिच्या या उत्तरानंतर सर्वांनीच टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

आशिकी गर्ल लग्नबंधनात नेमकी कधी अडकणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये आहे. आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा बरेच वर्ष सुरु होती. त्यानंतर ते विभक्त झाले असेही बोलले गेले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूरचं नाव राहुल मोदी याच्याशी जोडले जात आहे. पण, राहुल मोदी नेमका आहे तरी कोण?

काही दिवसांपूर्वीच श्रद्धाने राहुल मोदीसोबतच्या नात्याची पुष्टी केली होती. त्याच्यासाठी तिने इन्स्टाग्रावर खास स्टोरी पोस्ट केली होती. अप्रत्यक्षपणे या स्टोरीतून तिने डेट करत असल्याचा खुलासा केला. राहुलसोबतचा एक सेल्फी पोस्ट केला आणि एक मजेशीर कॅप्शनही लिहिले. 'दिल रख ले, नींद तो वापस दे दे यार' असं कॅप्शन दिले होते. तर, 'नींद चुराई मेरी' हे गाणे बॅकग्राउंडमध्ये वापरले होते.

जेव्हापासून श्रद्धा कपूरने राहुल मोदींसोबतच्या नात्याची पुष्टी केली तेव्हापासून त्यांच्या लग्नाची चर्चा होत आहे. राहुल मोदी हा पटकथालेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक आहे. रणबीरच्या 'तू झुठी मैं मक्कार' या सिनेमाचं त्याने दिग्दर्शन केले आहे. आणि सिनेमाच्या शूटिंगदरम्यान राहुलशी श्रद्धा कपूरशी भेट झाली. तेव्हापासूनच ते डेट करत असल्याची चर्चा होती. अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यात ते दोघे एकत्र स्पॉट झाले होते. त्यामुळे आता दोघे कधी लग्नबंधनात अडकणार असा प्रश्न चाहत्यांमध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

Mrunal-Bipasha: मृणाल बिपाशाच्या वादात हिना खानची एन्ट्री; अभिनेत्री म्हणाली, 'मी अशा चुका केल्या...'

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा, लोकलवरही परिणाम

भारताला धमकावणारे ट्रम्प रशियाच्या पुतिनसमोर शांत; 'पीसमेकर' प्रतिमेला धक्का, भेटीचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT