Shraddha Kapoor In Hollywood Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात काम करणार श्रद्धा कपूर

Shraddha Kapoor In Hollywood: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर आता हॉलिवूडमध्ये झळकणार आहे. श्रद्धा आता ऑस्कर विजेत्या ‘झूटोपिया' या डिस्नेच्या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे.

Shruti Vilas Kadam

Shraddha Kapoor In Hollywood: बॉलिवूडची लोकप्रिय लाडकी अभिनेत्री श्रद्धा कपूर आता हॉलिवूडमध्ये झळकणार आहे. आपल्या अभिनय आणि आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी श्रद्धा आता ऑस्कर विजेत्या ‘झूटोपिया' (Zootopia) या डिस्नेच्या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. ‘झूटोपिया-2' (Zootopia 2) या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी श्रद्धा कपूरला मुख्य पात्र ‘जुडी हॉप्स’च्या आवाजासाठी निवडण्यात आलं आहे. या भूमिकेद्वारे ती हॉलिवूडच्या विश्वात पहिले पाऊल ठेवत आहे.

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झूटोपिया' या अॅनिमेशन चित्रपटाला प्रेक्षकांनी जगभरातून भरभरून प्रेम दिलं होतं. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर पुरस्कार सोहळ्यांमध्येही धुमाकूळ घातला होता. ऑस्कर विजेता ठरलेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे ‘झूटोपिया-2' आता प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर हिंदी व्हर्जनमध्ये मुख्य पात्राला आवाज देणार आहे. तिचा गोड, खट्याळ आवाजाने ही व्यक्तिरेखा भारतीय प्रेक्षकांसाठी आणखी जवळची वाटेल, असा विश्वास चित्रपट निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

श्रद्धाने आपला आनंद व्यक्त करताना म्हटलं, “जुडी हॉप्स ही खूप प्रेरणादायी व्यक्तिरेखा आहे. तिला आवाज देताना मला वाटलं मी तिच्यासोबत जगतं आहे. ही भूमिका माझ्यासाठी स्वप्नपूर्तीच आहे.” यासह श्रद्धाच्या चाहत्यांनाही ही बातमी ऐकून प्रचंड आनंद झाला आहे. सोशल मीडियावर श्रद्धाच्या हॉलिवूड एन्ट्रीची चर्चा रंगली आहे.

झूटोपिया-2' भारतात अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून त्यातील हिंदी व्हर्जनवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरचा आवाज प्रमुख आकर्षण ठरणार आहे. बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये अशा मोठ्या स्तरावर पाऊल ठेवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये श्रद्धाचं नाव आता समाविष्ट झालं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT