Shilpa Shetty Dance Madhumas Baharla Song Instagram
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty Dance Video: बॉलिवूडलाही पडली मराठी गाण्याची भूरळ, शिल्पा थिरकली ‘बहरला हा मधुमास’वर...

Shilpa Shetty Dance On Marathi Song: बॉलिवूडची फिटनेस क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिल्पा शेट्टीनेही या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

Chetan Bodke

Shilpa Shetty Dance Madhumas Baharla Song: केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करीत आहे. सध्या चित्रपटातील गाण्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सना शिंदेने केलेल्या ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यातील हूक स्टेपवर अगदी लहानग्यांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांनाच डान्स करण्याचा मोह आवरलेला नाही.

किली पॉल सोबत त्याची बहिण आणि रिकी पॉन्ड या विदेशी डान्सर आणि कॉन्टेन्ट क्रियेटरला देखील भूरळ पडली आहे. अशातच बॉलिवूडची फिटनेस क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिल्पा शेट्टीनेही या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

‘बहरला हा मधुमास’ या गाण्यावर नाचतानाचा शिल्पाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या गाण्यावर सेलिब्रिटींंनीही व्हिडीओ बनवलेला आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्स सहित सेलिब्रिटीही या गाण्यावर व्हिडिओ शेअर करत आहेत. आता शिल्पा शेट्टीही या गाण्याच्या प्रेमात पडली असून तिने तिच्या इंस्टाग्रामवर बहरला या गाण्यावरील एक डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.यापूर्वी या गाण्यावर माधुरी दिक्षित सह नोरा फतेही आणि अनेक सेलिब्रिटींनी ठुमके लावले होते.

शिल्पा शेट्टीच्या या व्हिडीओवर मराठीसह काही बॉलिवूड सेलिब्रिटींनीही लाईक्स केले आहे. शिल्पाचा हा डान्स पाहून चाहते म्हणतात, खूप खूप सुंदर, तर आणखी एका चाहत्याने तिच्याच स्टाईलने सुपर से भी उपर म्हणत कमेंट केली आहे.

‘बहरला हा मधुमास’ हे गाणं देशातच नाही तर जगभरात लोकप्रिय झाले. टांझानियाच्या किली आणि नीमा यांनीही या गाण्यावर डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. किली आणि नीमाच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील हे गाणे श्रेया घोषालने गायले असून अजय अतुल या लोकप्रिय संगीतकार जोडीने ते संगीतबद्ध केले आहे. या गाण्याला आतापर्यंत लाखोच्या आसपास व्ह्यूज मिळाले असून व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला.

केदार शिंदे दिग्दर्शित आणि बेला शिंदे निर्मित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आता पर्यंत पाच कोटींची कमाई पार केली आहे. मुंबईसह महाराष्ट्रभरात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक एकच सध्या गर्दी करत आहे. अभिनेता अंकुश चौधरीने चित्रपटांत शाहीरांची भूमिका साकारली आहे. तर सना शिंदेने शाहीरांची पत्नी भानुमती साबळे यांचे पात्र साकारले आहे. अजय-अतुल यांचं संगीत चित्रपटाला लाभलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulajapur News: तुळजाभवानी मंदिर परिसरात पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

Diya Cleaning Tips : दिवाळीपूर्वी जुन्या पणत्या अन् समई करा नव्यासारखी लख्ख, 'ही' घरगुती ट्रिक २ मिनिटांत करेल काम

Maharashtra News Live Update: जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून खा. उदयनराजे भोसले यांचा अर्ज मागे

Hand Exercises : हाताच्या बोटांमध्ये वारंवार सुन्नपणा जाणवतोय? 'हे' ६ व्यायाम वेळीच करा,नाहीतर....

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात गुजरातमधून आणखी एकाला अटक, नेमकं कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT