Raghav- Parineeti Spot at Airport: साखरपुड्यासाठी बॉलिवूडचं क्यूट कपल निघालं दिल्लीला?; विमानतळावर झाले एकत्र स्पॉट...

Raghav- Parineeti at Airport: येत्या १३ मे ला हे दोघेही साखरपुडा आटोपणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. साखरपुड्याची चर्चा होत असताना ही जोडी पुन्हा एकदा विमानतळावर स्पॉट झाली आहे.
Raghav- Parineeti Spot Airport
Raghav- Parineeti Spot AirportInstagram

Raghav- Parineeti Spot at Airport: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होत आहे. गेल्या महिन्यात हॉटेलमध्ये डिनर डेटवर स्पॉट झाल्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. येत्या १३ मे ला हे दोघेही साखरपुडा आटोपणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. तर गेल्या काही दिवसांपुर्वी ते दोघेही आयपीएलच्या एका सामन्यात स्पॉट झाले होते. नुकतंच ही जोडी पुन्हा एकदा विमानतळावर स्पॉट झाली आहे.

Raghav- Parineeti Spot Airport
Rakhi Sawant Brother Arrested: राखी सावंतच्या भावाला पोलिसांनी केली अटक, नेमकं काय आहे प्रकरण?

येत्या 13 मे ला परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांची एंगेजमेंट होणार असल्याची चर्चा रंगली होती. नुकतंच ही जोडी आज सकाळी विमानतळावर मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर स्पॉट झाली होती. दोघांनीही सिंपल लूकमध्ये विमानतळावर मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर पोजेस दिल्या.

परिणीतीने दिल्लीला जाताना, डार्क पिंक ड्रेस घातला होता. तर राघवने ब्लॅक शर्ट आणि क्रीम कलरची पॅन्ट घातली होती. यावेळी दिल्लीला जाताना पुन्हा एकदा मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर स्पॉट झाले. मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती आणि राघवचा साखरपुडा शनिवारी दिल्लीत होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघवच्या साखरपुड्यासाठी जवळपास १५० लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. साखरपुड्याच्या या आमंत्रितांमध्ये दोघांचेही जवळचे मित्र आणि कुटुंबीयांना आमंत्रित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. लग्नाची तारीख अद्याप ठरलेली नसून या वर्षाखेरीसच ते लग्नबंधनात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अनेकदा बॉलिवूडचं हे क्यूट कपल, परिणीती आणि राघव चड्ढा अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत, नुकत्याच आयपीएलच्या (IPL) झालेल्या एका मॅचमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर रविवारी संध्याकाळी मुंबईतील वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये सुद्धा डिनरसाठी जाताना स्पॉट झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com