Sara Ali Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sara Ali Khan पडली प्रेमात? केदारनाथ मधला 'तो' VIDEO व्हायरल, नेत्याच्या मुलाला करतेय डेट?

Sara Ali Khan Visits Kedarnath Temple : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा एक केदारनाथ मधील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

सारा अली खान (Sara Ali Khan ) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा सारा तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आली आहे. नुकतीच सारा केदारनाथ धामला जाऊन आली आहे. त्याचे फोटो देखील तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सारा दरवर्षी केदारनाथ धामला महादेवाची (Kedarnath ) मनोभावे पूजा करायला जाते.

सध्या सोशल मीडियावर साराचा एक केदारनाथ धाम मधला व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात सारा अर्जुन प्रताप बाजवासोबत दिसत आहे. त्यांचा फोटो देखील व्हायरल होत आहे. हा साराचा नवा बॉयफ्रेंड तर नाही ना, ती पुन्हा प्रेमात पडली अशा चर्चांना उधाण आले आहे. व्हायरल फोटो आणि व्हिडीओमध्ये सारा अली खान आणि अर्जुन प्रताप बाजवा एकत्र बाजूला उभे राहून दर्शन घेताना पाहायला मिळत आहे. ते एकत्र पूजा करत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, अर्जुन प्रताप बाजवा (Arjun Pratap Bajwa) हा मॉडेल आणि MMA फायटर आहे. पंजाबमधील भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष फतेह जंग सिंग बाजवा होते आणि त्यांचा मुलगा अर्जुन प्रताप बाजवा हा काँग्रेसचा खासदार आहे. अर्जुनने कृषी विषयात डिग्री संपादन केली आहे. अर्जुन प्रताप बाजवा हा साराला इन्स्टाग्रामवर फॉलो देखील करतो. अर्जुनने 'सिंग इज ब्लिंग' या अक्षय कुमारच्या चित्रपटात काम देखील केले आहे. आतापर्यंत सारा अली खान आणि अर्जुन प्रताप बाजवा यांच्या डेटींगच्या चर्चांवर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान अलिकडेच 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तसेच तिने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ: दुसऱ्या टी-20 मध्ये श्रेयस अय्यरची एंट्री? या खेळाडूचं स्थान धोक्यात, पाहा संभाव्य प्लेईंग 11

Health Care : दररोज मखाना खाल्याने होतात 'हे' फायदे, जाणून घ्या

Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकली, तरुणीचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

Maharashtra Live News Update: ईव्हीएमच्या मुद्द्यावरून धाराशिवमध्ये असंतोष निर्माण करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत लवकरच निर्णय; आठव्या वेतन आयोगाबाबत नवीन अपडेट

SCROLL FOR NEXT