अवघ्या ५ वर्षांचा प्रवास थांबणार! 'Aai Kuthe Kay Karte' घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्याने केली भावुक पोस्ट

Milind Gawali Post : 'आई कुठे काय करते' ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेतील अभिनेत्याने पोस्ट करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
Milind Gawali Post
Aai Kuthe Kay KarteSAAM TV
Published On

अखेर पाच वर्षांनी लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या संदर्भातील पोस्ट स्वतः मालिकेचा अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी केली आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत ते 'अनिरुद्ध'ची भूमिका साकारत आहे. या मालिकेने कायमच प्रेक्षकांचे मन जिंकले. या मालिकेचा टीआरपी देखील उत्तम होता.

'आई कुठे काय करते' या मालिकेने अनेक वेळा कथानकाचे वळण बदलले तसेच अनेक नवीन कलाकार आले. तरीही प्रेक्षकांच्या प्रेम कमी पडले नाही. आता ही मालिका बंद होणार त्यामुळे अनेक प्रेक्षक नाराज आहेत. विशेषता महिला वर्गाची ही सर्वात आवडती मलिका आहे. संध्याकाळी अनेकांच्या घरात 'आई कुठे काय करते' याची हा आवाज ऐकू येत असे.

मिलिंद गवळींची पोस्ट

"मी मिलिंद गवळी , स्टार प्रवाह परिवार आणि Director's Kut Prodn, कडून तुम्हा मायबाप प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना ही दीपावली सुखमय शांतीपूर्ण आरोग्यदायी यशस्वी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आमची "आई कुठे काय करते" ही स्टारप्रवाह वरची मालिका आपला लवकरच निरोप घेणारआहे. डिसेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२४ हा या मालिकेचा प्रवास होता, या प्रवासामध्ये दोन कोविडचे लॉकडाऊनस, आम्ही मात्र एक महिना आधीच शूटिंग ला सुरुवात , आणि लॉकडाऊन च्या काळात स्टारप्रवाहने "आईकुठेकायकरते" चे भाग पुन्हा प्रक्षेपित केल्यामुळे अनेक लोक जी घरात अडकून पडली होती त्यांनी पुन्हा सिरीयल पाहिली, ती इतकी भावली की अक्षर: या आमच्या मालिकेला तुम्हा सर्वांनी डोक्यावर घेतलं, आमच्यावर भरभरून प्रेम करत राहिले, आमचे निर्माते राजनजी शाही आणि स्टार प्रवाहचे मुख्य अधिकारी सतीशजी राजवाडे यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला जोमानं काम करण्यासाठी सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं, स्टार प्रवाहने आम्हाला त्यांच्या इतर कार्यक्रमांमध्ये आमंत्रण देऊन, मग ते "होऊ दे धिंगाणा" किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये आमचं कौतुक करून जाहिरात ही केली.

DKP चे विवेक भाई, आरिफ भाई रणजीत जी यांनी आम्हाला कशाचीही कमतरता पडू दिली नाही, तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की ठाण्यामध्ये जो समृद्धी बंगला ज्यामध्ये आम्ही शूटिंग करत होतो, त्या वास्तूमध्ये आम्ही 45 ते 50 वेगवेगळे सेट्स लावले, हॉस्पिटल्स, ऑफिसेस, रेस्टॉरंट्स, कोटरूम,पोलीस स्टेशन, वेगवेगळ्या बेडरूम्स, वेगवेगळी घर, आश्रम, लग्नाचे हॉल, किती सांगू, आमचं आर्ट डिपार्टमेंट हे फारच म्हणजे फार भारी होतं, त्याचबरोबर ठाण्यामध्ये आउटडोर शूटिंगला इतर शहरांमध्ये होतो तसा काही त्रास नाहीये, असंख्य रस्त्यावरचे, दुकानातले, बस स्टॉप वरचे सीन्स आम्ही प्रत्यक्ष लोकेशन वर केले, आणि पब्लिकचा कधीही त्रास झाला नाही, नमिता वर्तक यां ची कथा पटकथा खूप भारी होती, या सिरीयलचे संवाद छान असायचे, प्रेक्षक कान देऊन ऐकायचे, ड्रेस डिपार्टमेंट एक नंबर, मेकअप डिपार्टमेंट एक नंबर, सगळेच डिपार्टमेंट भारी होते, दिग्दर्शनाचं डिपार्टमेंट सुद्धा कमाल, भट्टी जमलीच होती, आणि विशेष म्हणजे कलाकार, या सिरीयल मध्ये एकापेक्षा एक कलाकार होते, आपल्या आपल्या पात्रात चपख्खल बसलेले, आप्पा, कांचनआई, अरुंधती, संजना, अभी, यश,इशा,अनघा,विमल, शेखर विशाखा आरोही गौरी, आशुतोष, नितीन, सुलेखा ताई, विद्याताई, अण्णा (जयंत सावरकर), जुनी संजना, अंकिता, अविनाश अजून खूप पाहुणे कलाकार होते. मी हा सर्वांचा आभारी आहे."

Milind Gawali Post
Bigg Boss 18: 'टाइम गॉड' बनताच विवियनचा स्वॅगच बदलला, थेट 'या' दोन सदस्यांना पाठवलं जेलमध्ये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com