Richa Chaddha
Richa Chaddha Saam Tv
मनोरंजन बातम्या

Richa Chaddha: अभिनेत्री रिचा चड्ढानं भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप; आधी 'ते' ट्विट केलं, नंतर मागितली माफी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Richa Chadha Tweet On Galwan: अभिनेत्री रिचा चढ्ढा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. फोटोंमुळं सोशल मीडियावर कायम चर्चा होत असते. आता मात्र, रिचा वादग्रस्त ट्विटमुळं चर्चेत आली आहे. अभिनेत्री रिचानं एक ट्विट केलं आहे. गलवान खोऱ्याबाबत केलेल्या ट्विटमुळं ती टीकेची धनी ठरली आहे. मात्र, टीका झाल्यानंतर रिचानं आता माफी मागितली आहे.

भारतीय सेनेचे उत्तरी सीमेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे ट्विट रिट्विट करत रिचाने 'गलवान सेज हाय' अशा आशयाची कॅप्शन त्यात पोस्ट केली. रिचा चढ्ढाच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका होत आहे.

भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी रिचा चढ्ढाचे ट्विट लाजिरवाणे असल्याचे म्हटले आहे. ते ट्विट लवकरात लवकर मागे घ्यावे, असे त्यांनी म्हटले आहे. हा आपल्या सैन्याचा अपमान आहे, जो योग्य नाही, असेही ते म्हणाले.

मनजिंदर सिंग यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला असून ज्यात त्यांनी रिचा चढ्ढाचे वर्णन 3rd Grade अभिनेत्री म्हणून केले आहे. रिचा चढ्ढासारखी 3rd Grade असलेली अभिनेत्री पब्लिसिटी स्टंटसाठी भारतीय लष्कराचा अपमान करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.X`

रिचा चढ्ढा कॉंग्रेस पक्षाची समर्थक आहे. त्यामुळे या ट्विटमध्ये तिची भारतविरोधी विचारसरणी स्पष्टपणे दिसत आहे, अशीही टीका केली जात आहे. रिचा चढ्ढाच्‍या या ट्विटनंतर सोशल मीडियावर तिच्यावर सडकून टीका करण्यात येत आहे. गलवान संघर्षात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा आणि भारतीय लष्कराचा ती अवमान करत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक यूजर्सने व्यक्त केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

भारतीय लष्कराचे उत्तरी सीमेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अलीकडेच पाकव्याप्त काश्मीर (पीओके)बाबत मोठे वक्तव्य केले आहे. पीओके लष्कर परत घेण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते. केवळ शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. रिचाने हे ट्विट रिट्विट करत त्यावर गलवानबाबत कॅप्शन पोस्ट केली. यावरून तिच्यावर टीका होत आहे. आता तिने हे ट्विट डिलिट केल्याचे दिसते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर रात्री थरार; चिकन तंदुरीवरून वाद उफाळला, तरूणाला रस्त्याच्या मधोमध संपवलं

Today's Marathi News Live : पंतप्रधान मोदींचा आज पुण्यात मुक्काम

Maharashtra Election: इंडिया आघाडीचं सरकार आलं तर कोण होणार पंतप्रधान? पटोलेंनी उघडं केलं गुपित

Aligarh News : मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला; नवरा-बायकोवर गुन्हा

ED, CBI तुमच्या हातातील बाहुले होते, मग तुम्ही 2014 ची निवडणूक का हारले; काँग्रेसच्या आरोपांवर PM मोदी संतापले

SCROLL FOR NEXT