Bollywood Actress SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रीच्या आईच्या घरी चोरी, लग्जरी घड्याळे अन् दागिन्यांवर चोरांनी मारला डल्ला

Raveena Tandon Mother Jewellery Worth 25 Lakh Stolen : बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी चोरी झाली आहे. अभिनेत्रीच्या आईचे २५ लाख रुपयांचे दागिने चोरले. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्रीच्या आईच्या घरी चोरी

२५ लाख रुपयांचे दागिने लंपास

संशयित महिलेला अटक

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरात चोरीची घटना घडली आहे. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा भाऊ राजीव टंडन यांच्या घरातून २५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहे. ही घटना जुहू येथील त्यांच्या घरात घडली. या प्रकरणात पोलीसांनी ४७ वर्षीय महिलेला अटक केली आहे. ही संशयित महिला खार येथे राहते. तिचे नाव राशी छब्रिया असे आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, संशयित महिला रवीना टंडनच्या आईच्या घरी कामाला होती. अभिनेत्रीच्या वृद्ध आईची काळजी घेण्यासाठी त्याला महिलेला ठेवण्यात आले होते. ती वारंवार या घरी येत-जात असे. महिलेने तिजोरी तोडली आणि रवीना टंडनच्या आईचे सोन्याचे दागिने, राजीव टंडन यांची दोन महागडी घड्याळे चोरल्याचा आरोप तिच्यावर आहे. राजीव टंडन यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली असून एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले आहे.

राजीव टंडन आपल्या आईसोबत जुहू येथील निप्पॉन सोसायटीमधील 'टंडन हाऊस' येथे राहतात. एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, ऑगस्ट २०२५ मध्ये घराच्या रिपेयरिंगचे काम सुरू होते. घरातील अनेक मौल्यवान वस्तू सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्या बहिणीच्या घरी हलवण्यात आल्या होत्या. मात्र, वीणा टंडन (रवीना यांची आई) यांचे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने दुसऱ्या मजल्यावर असलेल्या राजीव टंडन यांच्या बेडरूमला लागून असलेल्या 'वॉर्डरोब रूम'मधील एका तिजोरीत कुलूप लावून सुरक्षित ठेवण्यात आले होते. २ ऑक्टोबर २०२५ रोजी दसरा सणाच्या निमित्ताने जेव्हा कुटुंबाने आपल्या दागिन्यांची तपासणी केली, तेव्हा त्यांना ती तिजोरी तोडलेली आढळली. तसेच, त्यातील सोन्याचे आणि हिऱ्यांचे अनेक दागिने, दोन महागडी मनगटी घड्याळे चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राशी छब्रिया ही महिला २०२० पासून टंडन कुटुंबाच्या घरात काम करत आहे. छब्रियाचे या कुटुंबाशी अत्यंत जवळचे संबंध निर्माण झाले. दुसऱ्या मजल्यावर जाण्याची परवानगी केवळ कुटुंबातील सदस्यांना आणि राशीलाच होती. त्यामुळे तिच्यावर संशय आल्याने राजीव टंडन यांनी तिला जाब विचारला, मात्र सुरुवातीला तिने चोरीला गेलेल्या मौल्यवान वस्तूंबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगून नकार केला. मात्र, जेव्हा कुटुंबाने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा छब्रियाने तिजोरी तोडून त्यातील दागिने आणि घड्याळे घेतल्याचे कबूल केले. छब्रियाने दोन घड्याळे परत केली; परंतु दागिने मात्र परत केले नाहीत. हे दागिने आपण 'जगदीश' नावाच्या एका व्यक्तीकडे दिले असल्याचे सांगत, तिने ते परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दागिने परत मिळाले नाही.

छब्रियाने तिच्या एका साथीदाराकरवी जो पोलिसांचा खबरी आहे त्याला धमकावले. जर त्याने दागिने परत मिळवण्यासाठी तिच्यावर दबाव आणला, तर त्याला अंमली पदार्थांच्या एका खोट्या गुन्ह्यात गोवले जाईल, अशी धमकी देण्यात आली होती, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या बांगड्या, ब्रेसलेट्स, हार, लॉकेट्स, अंगठ्या, कानातले, हिरे जडवलेले मंगळसूत्र आणि इतर हिऱ्यांच्या दागिन्यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत २५ लाख रुपये इतकी आहे.

छब्रिया दागिने परत करणार नाही याची कुटुंबाला खात्री पटली, तेव्हा राजीवने जुहू पोलिसांशी संपर्क साधला आणि १९ मे रोजी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. जुहू पोलिसांनी तिला २१ मे रोजी अटक केली, त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले आणि २९ मेपर्यंत ती पोलीस कोठडीत होती, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. सध्या चोरीस गेलेल्या मौल्यवान वस्तूंचा शोध घेण्याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT