Rakhi Sawant And Sherlyn Chopra Friendship Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant And Sherlyn Chopra: आधी आरोपांच्या फैरी झाडल्या अन् आता मैत्री, राखी- शार्लिनचा आता नवा ड्रामा

आदिल खानच्या कस्टडीत वाढ केल्यानंतर राखी आणि तिची मैत्रिण शार्लिन चोप्रा बरीच आनंदीत झाली आहे.

Chetan Bodke

Rakhi Sawant And Sherlyn Chopra Friendship: सध्या बॉलिवूड अभिनेत्री आणि ड्रामा क्विन राखी सावंत बरीच चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राखी आणि पती आदिल खान यांच्यातील वाद बराच विकोपाला गेला आहे. राखीने पती आदिल विरोधात अनेक आरोप करत पोलीस स्थानकात धाव घेतली होती. सध्या त्याची पोलिसांनी रवानगी जेलमध्ये केली आहे. त्याच्या कस्टडीत वाढ केल्यानंतर राखी आणि तिची मैत्रिण शार्लिन चोप्रा बरीच आनंदीत झाली आहे.

नुकताच राखी सावंत आणि शर्लिन चोप्राचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघी पापाराझींसमोर पोज देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सने यावर कमेंट देखील केल्या आहेत. कारण काही दिवसांपूर्वी शर्लिनने राखीविरुद्ध तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी राखीला चौकशीसाठी बोलावले होते, मात्र आता दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत.

या दोघींच्या ही ड्राम्यावर नेटकऱ्यांनी सध्या तरी हास्याची भूमिका घेतली आहे. दोघींनाही सध्या नेटकऱ्यांनी बरेच ट्रोल करत आहेत. यावर नेटकरी म्हणतात, "एवढा ड्रामा होऊनही चांगल्या मैत्रीणी", "या दोघी एकत्र येऊन आता सर्वांना नक्की वेडं करणार", "नवा सीझन नवा एपिसोड" अशा कमेंट नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

यावेळी राखीने शर्लिन चोप्राचे खूप कौतुक केले आहे. ती म्हणाली, 'मला सांत्वन दिल्याबद्दल मला तिचे आभार मानायचे आहेत. आमची खूप चांगली मैत्री झाल्याचा मला फारच आनंद झाला आहे. तिने मला अनेक समस्येतून बाहेर काढले आहे, तिने मला अनेक गोष्टींपासून प्रवृत्त केले त्यामुळे मी तिची खूप आभारी आहे."

राखी सावंतने पती आदिल खान दुर्रानी विरुद्ध आयपीसी कलम 498A, 377, 406, 323,504, 506 अंतर्गत एफआयआर दाखल केली होती, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT