kartik aryan
kartik aryansaam tv

Shehzada Movie: कार्तिकची शक्कलच न्यारी, चित्रपटावरही बाय वन गेट वन ऑफर, वाचा सविस्तर...

कार्तिकची चित्रपटप्रेमींना खास ऑफर.
Published on

Shehzada Movie Tickets : कार्तिक आर्यनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'शेहजादा' आज म्हणजे १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची आणि कार्तिक आर्यनची खूप चर्चा होत होती. या चित्रपटाचे प्री-बुकिंग देखील या आठवड्यात सुरू झाले होते. पण जर तुम्ही तिकीट अद्याप बुक केलं नसेल तर करतही तुमच्यासाठी खास गिफ्ट घेऊन आला आहे.

'शहजादा' कार्तिक आर्यनने त्याच्या सोशल मीडियावरून एक विडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो एका छोट्या मुलासोबत दिसत आहेत. तसेच हा एक फनी व्हिडिओ आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिकने चित्रपटाचा जॉनर सांगितले आहे. तसेच एक ऑफर देखील दिली आहे.

kartik aryan
Swara Bhasker Marriage : अभिनेत्री स्वरा भास्करने फहाद अहमदसोबत बांधली लगीनगाठ, पाहा लग्नाचा फोटो

कार्तिक या व्हिडिओमध्ये लहान मुलाशी बोलत आहे. तसेच त्या मुलाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत चित्रपटाची माहिती देत आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक म्हणाला हे की, "अरे गाण्याचे नाव 'डायपर गिला' नाही तर 'कॅरेक्टर ढिला है' आहे. आणि एक उद्या 'शेहजादा' बघायला येत बघायला येत आहेस ना? आणि ऍडव्हान्स बुकिंग केलास तर एका तिकिटावर एक तिकीट फ्री आहे. अरे अॅक्शन कॉमेडी आहे हॉरर नाही. यावेळी जास्त डायपर घेऊन ये, हसून हसून ओला झाला तर."

या व्हिडिओतून कार्तिकने चित्रपटप्रेमींना आणि त्याच्या चाहत्यांना एक ऑफर दिली आहे. तसेच ही कशी वापरायची हे देखील सांगितलं आहे. पोस्ट च्या कॅप्शनमध्ये त्याने ही माहिती दिली आहे.

ट्रेड अॅनालिस्ट निशित शॉ यांच्या मते, 'शेहजादा' चित्रपटाचे एकूण बजेट 85 कोटी आहे. चित्रपट बनविण्यासाठी 65 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून 20 कोटी रुपये प्रिंट आणि जाहिरातीवर खर्च करण्यात आले आहेत.

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी चित्रपटातील म्युजिक राईट 10 कोटींना विकले गेले आहेत, तर 'शेहजादा'चे सॅटेलाइट राईट 15 कोटींना विकले गेले आहेत. 'शेहजादा'चे ओटीटी हक्क 40 कोटी रुपयांना डिजिटल स्ट्रीमिंग नेटफ्लिक्सला विकले गेल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे विदेशी हक्कही 5 कोटींना विकले गेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com