Rakhi Sawant Hospitalized Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Health Update: राखी सावंतला नेमकं काय झालं?, Ex Husband ने दिली हेल्थ अपडेट

Rakhi Sawant Hospitalized : बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंतला मंगळवारी मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राखीचा Ex Husband रितेशनं तिच्या हेल्थबाबत सांगितलं आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंतला मंगळवारी मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिचा एक्स नवरा रितेश सिंहने दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्रीची तब्येत खूपच गंभीर आहे. दैनिक भास्करला दिलेल्या माहितीनुसार, राखी सध्या काही गंभीर आजारांचा सामना करत आहे. त्यामुळे तिची तब्येत सध्या व्यवस्थित नाही. त्यामुळे तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रितेशने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी सांगितले की, राखीच्या पोटाला सूज आहे. तिला किडनी आणि हृदयासंबंधित आजार सांगितले आहे. डॉक्टरांनी तिच्या संबंधित टेस्टही केलेल्या आहेत, पण अजून तरी टेस्टचे रिपोर्ट आलेले नाहीत. तिची सोनोग्राफी केली असून, त्या रिपोर्टमध्ये तिच्या पोटात गाठ असल्याचे उघड झाले आहे. नेमकी ही गाठ कसली आहे, याचा तपास सध्या डॉक्टर करीत आहेत.

अनेकांच्या मते राखी मस्करी आणि ड्रामा करतेय. तिच्या बोलण्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. पण ती तिच्या हेल्थबद्दल खरं बोलत आहे. तिचं वागणं आणि स्वभाव कसाही असला तरीही ती एक मनुष्य आहे. सध्या तिच्या हेल्थची आम्ही काळजी घेत असून ती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत.

राखीची आर्थिक परिस्थितीही नाजूक आहे. संपूर्ण घराचा खर्च ती सध्या स्वत: पाहत आहे. त्यासोबतच स्वत:चा मेडिकल खर्चही ती स्वत: करत आहे. मंगळवारी संध्याकाळी राखी सावंतला मुंबईतल्या एका खासगी हॉस्पिटलला दाखल केलं होतं. तिचे हॉस्पिटलमधील फोटोज् आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या बातमीमुळे राखीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरन्यायाधीश भूषण गवईंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Police Constable Bharti: धक्कादायक! ७,५०० कॉन्स्टेबल पदासाठी १०,००,००० अर्ज; पीएचडी, इंजिनियर अन् पदवीधारकांकडून प्रयत्न

सांगलीत अजित पवारांचा नेता मोठा निर्णय घेणार, पक्षविरहित स्थानिक निवडणूक लढवणार

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT