बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, दिंडोशी सत्र न्यायालयाने राखी सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे राखीवर अजूनही अटकेची टांगती तलवार आहे. राखी सावंतने आपल्या आयुष्यातील खासगी आणि आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप तिचा विभक्त पती आदिलने केला होता. (Bollywood Actress)
याप्रकरणी, आदिलने राखीविरोधात तक्रारही दाखल केली होती. राखीविरुद्ध आदिलने मानहानीसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. आदिल खानने राखी सावंत विरोधात पोलिसांत तक्रारही केली होती. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी राखीवर कलम 500, कलम 34 आणि कलम 67A अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. (Bollywood News)
दरम्यान, गुन्हा दाखल होताच राखी सावंतने दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र दिंडोशी सत्र न्यायालयाचे राखी सावंतचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीकांत भोसले यांनी राखी सावंतला दिलासा देण्यास नकार दिला आहे. (Mumbai Court)
त्यामुळे राखी सावंतच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर राखीला केव्हाही अटक होऊ शकते, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राखी सावंत नेमकं या प्रकरणात उच्च कोर्टात धाव घेणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.