Divya Pahuja News : हत्येच्या ११ दिवसांनतर सापडला दिव्या पाहुजाचा मृतदेह, 'या' पुराव्यामुळं मिळालं पोलिसांना यश

Gurugram Model Divya Pahuja : हत्येच्या ११ दिवसांनंतर दिव्या पाहुजाचा मृतदेह शोधण्यात गुरूग्राम पोलिसांना यश मिळालं आहे. पोलिसांना तिचा मृतदेह कालव्यात सापडला आहे.
Divya Pahuja News
Divya Pahuja NewsSaam Tv
Published On

Divya Pahujas Body Found 11 Days After Killing

गुरुग्राम मॉडेल दिव्या पाहुजा (Divya Pahuja) हिचा काही दिवसांपूर्वी खून झाल्याची घटना घडली होती. हत्येच्या ११ दिवसांनंतर दिव्याचा मृतदेह कालव्यात सापडला आहे. याप्रकरणी पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आलेल्या बलराज नावाच्या आरोपीची चौकशी केल्यानंतर दिव्या पाहुजाचा मृतदेह ताब्यात घेण्यात हरियाणा पोलिसांना यश आलंय. खुनानंतर दिव्याचा मृतदेह हरियाणाच्या तोहाना कालव्यात फेकून दिल्याचं खुद्द बलराजनं पोलिसांना सांगितलं होतं. (latest marathi crime news)

सहा पथकं मृतदेहाच्या शोधात व्यस्त

पोलिसांनी गुरुग्राम मॉडेल दिव्या पाहुजा हिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे २५ सदस्यीय पथक पटियाला येथे पोहोचले होते. गुरुग्राम आणि पंजाब पोलिसांसह एनडीआरएफची टीम पटियाला ते खनौरी सीमेपर्यंतच्या कालव्यात मृतदेहाचा शोध घेत होती. मात्र, दिव्याचा मृतदेह (Divya Pahujas Body) हरियाणातील तोहाना कालव्यातून सापडला. पोलिसांनी कालव्यातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याचा फोटो दिव्याच्या कुटुंबीयांना पाठवला. ते पाहून त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. गुरुग्राम गुन्हे शाखेचे सहा पथकं मृतदेहाच्या शोधात व्यस्त होते. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृतदेहाची विल्हेवाट

२ जानेवारीला दिव्याची गुरुग्राममधील सिटी पॉइंट हॉटेलच्या रूम नंबर १११ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हॉटेल मालक अभिजीत सिंग याने ही घटना घडवली. याप्रकरणी पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आलेल्या बलराज नावाच्या आरोपीची चौकशी केल्यानंतर दिव्या पाहुजाचा मृतदेह ताब्यात घेण्यात हरियाणा पोलिसांना यश आलंय. दिव्याचा (Divya Pahuja) मृतदेह हरियाणाच्या तोहाना कालव्यात फेकून दिल्याचं खुद्द बलराजने पोलिसांना सांगितलं होतं. वास्तविक, दिव्या पाहुजा हत्याकांडातील मुख्य आरोपी अभिजीत सिंग याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी साथीदार बलराज गिलवर सोपवली होती.

बलराज देश सोडून बँकॉकला पळून जाण्याचा विचार करत होता. त्याला आणि रवी बंगाला कोलकाता विमानतळावरून अटक करण्यात आली. बलराज गिलने दिव्याचा मृतदेह (Divya Pahujas Body) त्याचा बॉस अभिजीतच्या बीएमडब्ल्यू कारच्या ट्रंकमध्ये टाकून त्याची विल्हेवाट लावली होती. या कामात रवी बंगा त्यांना साथ देत होता. अभिजीत सिंगने त्याच्या हॉटेलच्या दोन कर्मचाऱ्यांसह दिव्याचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून त्याच्या बीएमडब्ल्यू कारच्या ट्रंकमध्ये ठेवला. मग त्याने गाडीच्या चाव्या बलराजकडे दिल्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितले. या कामासाठी अभिजीतने त्याला १० लाख रुपयेही दिले होते.

Divya Pahuja News
Rajasthan Crime News : प्रेमाचा भयंकर शेवट; रात्री घरी भेटायला गेलेल्या प्रियकरानं प्रेयसीला निर्घृणपणे संपवलं

हत्येप्रकरणी ६ आरोपींना अटक

गुरुग्राम (Gurugram) क्राइम ब्रँचने या (Divya Pahuja) हत्येप्रकरणी ६ आरोपींची नावे दिलीय. त्यात मुख्य आरोपी अभिजीत सिंग, हेमराज, ओम प्रकाश, मेघा, बलराज गिल आणि रवी बंगा यांची नावे आहेत. या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

दिव्या पाहुजा बलदेव नगर गुरुग्राम (Gurugram) येथील रहिवासी होती. तिची धाकटी बहीण नयनाने दिलेल्या माहितीनुसार, २ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दिव्यासोबत तिचं शेवटचं बोलणं झालं होतं. दिव्याने अर्ध्या तासात घरी पोहोचणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, सायंकाळी सहा वाजेपर्यंत ती परत न आली नाही. त्यामुळं कुटुंबीयांना काहीतरी गडबड झाल्याचा संशय आला. नयनाच्या तक्रारीवरून गुरुग्रामच्या सेक्टर-१४ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Divya Pahuja News
West Bengal Crime News : रस्ता चुकलेल्या ३ साधूंना जमावाकडून मारहाण, पोलिसांनी वाचवले प्राण, १२ जणांना अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com