Famous Actress SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress : मामाशी लग्न करावं लागलं, वयाने मोठ्या अभिनेत्यासोबत प्रेमसंबंध ठेवल्याचा अभिनेत्रीला पश्चात्ताप; उघड केलं इंडस्ट्रीतील 'काळे सत्य'

Famous Actress Bad Experience : आपल्या कारकिर्दीतील सर्वात कठीण भूमिकेबद्दल प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितले, ज्यात तिला मामासोबत लग्न करावे लागले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्रीला एका चित्रपटात मामाशी लग्न करावे लागले

मोठ्या वयाच्या अभिनेत्यासोबत रोमान्स करावा लागला

पुरुषप्रधान वातावरणात काम करण्याचा अनुभव सांगितला

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे तिच्या 'अक्का' वेब सीरिजमुळे चांगलीच चर्चेत आहे. ज्यात दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश देखील आहे. या वेब सीरिजला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. राधिका आणि कीर्ती दोघीही सध्या आपल्या प्रोजेक्टचे जोरदार प्रमोशन करत आहेत. याच दरम्यान, त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवरही भाष्य केले.

अभिनेत्री राधिका आपटेने हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती काही तेलगू चित्रपटांमध्ये दिसली आहे. एका तेलगू चित्रपटाची आठवण काढत तिने झूमला सांगितले, "मी एक तेलगू चित्रपट केला होता, ज्यात मला माझ्या मामाशी लग्न करायचे होते. ती माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण भूमिका होती. मला त्या चित्रपटातील प्रत्येक गोष्टीचा तिरस्कार वाटत होता." राधिकाकडून हे ऐकून कीर्ती सुरेशला सुरुवातीला धक्का बसला, पण नंतर ती हसू लागली. त्यानंतर तिने सूत्रसंचालक आणि प्रेक्षकांना सांगितले की, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये एखाद्या पात्राचे लग्न तिच्या मामाशी होणे ही एक सामान्य गोष्ट आहे.

राधिकाने पुढे स्पष्ट केले, "हो, पण मला माझ्यापेक्षा खूप मोठ्या असलेल्या एका अभिनेत्यासोबत रोमान्ससुद्धा करावा लागला. तिथले वातावरण आणि मानसिकता खूप पुरुषप्रधान होती. हा माझ्यासाठी सर्वात कठीण भाग होता. मग, चित्रपटाच्या मध्यावर माझ्या पात्राचा मृत्यू होतो. त्यांना मला खांद्यावर उचलून घेऊन मग ती कृती करावी लागली. मी सतत विचार करत होते, 'माझं पात्र कधी मरणार?'"

राधिकाने मुलाखतीत चित्रपटाचे नाव घेतले नाही. राधिका आपटेने 2010 मध्ये राम गोपाल वर्माच्या 'रक्त चरित्र' चित्रपटातून तेलुगूमध्ये पदार्पण केले, जे हिंदीमध्येही प्रदर्शित झाले. 2012 मध्ये, तिने प्रकाश राजच्या 'धोनी' या तमिळ चित्रपटात काम केले होते, जो तेलुगूमध्येही प्रदर्शित झाला होता. तिने बालकृष्णासोबत 'लेजेंड' (२०१४) मध्ये काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा वधारले! २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे ताजे भाव

Rava Batatyacha Paratha Recipe : रवा आणि बटाट्यापासून बनवा कुरकुरीत चिला; चव इतकी भारी की रोज खाल

Maharashtra News Live Update : शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन

SIR Update : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! फॉर्म 6 मध्ये महत्त्वाचा बदल

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! माजी आमदारासह जिल्हाप्रमुख अन् तालुकाप्रमुखांचा 'जय महाराष्ट्र'; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT