Preity Zinta Saam Tv
मनोरंजन बातम्या

Preity Zinta Birthday: प्रीतीच्या अंडरवर्ल्ड कनेक्शने बॉलिवूडला बसला होता धक्का, तिच्या एका निर्णयाचं आजही होतंय कौतुक...

प्रीती एका प्रकरणामुळे बरीच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तिच्या एकटीमुळे संपुर्ण बॉलिवूड इंडस्ट्री देखील हादरली होती.

Chetan Bodke

Preity Zinta Birthday: बॉलिवूडमध्ये डिंपल गर्ल म्हणून चर्चेत असलेल्या प्रीती झिंटाचा आज वाढदिवस आहे. डिंपल गर्ल आज तब्बल 48 व्या वर्षात पदार्पण करत आहे. तिने आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनांवर राज्य केले. निर्भिडपणे बोलणाऱ्या स्टार्समध्ये प्रितीची गणना होते. ती एका प्रकरणामुळे बरीच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तिच्या एकटीमुळे संपुर्ण बॉलिवूड इंडस्ट्री देखील हादरली होती.

ही कथा आहे २००१ या काळातील. त्याच वेळी प्रीतीचा 'चोरी चोरी छुपके छुपके' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी प्रीतीने अंडरवर्ल्ड डॉनविरोधात कोर्टात साक्ष दिली होती. या चित्रपटात सलमान खान, राणी मुखर्जी यांनी भूमिका केल्या होत्या आणि अब्बास मस्तान यांनी चित्रपटाचे दिग्दर्शित केले होते.

फक्त चित्रपटाची निर्मिती हिऱ्याचे व्यापारी भरत शाह आणि नाझिम रिझवी यांनी केली होती, पण प्रत्यक्षात चित्रपटाला अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलने फंड पुरवला होता.

ज्यावेळी कोणाचीच अंडरवर्ल्डच्या विरोधात जीभही उघडत नव्हती, त्यावेळी प्रितीने कोर्टात जाऊन डॉन छोटा शकीलविरोधात साक्ष दिली. वास्तविक, प्रीतीला सतत धमकीचे फोन येत होते, त्यामुळे प्रीतीने कोर्टात डॉन छोटा शकील विरोधात साक्ष दिली होती.

अंडरवर्ल्डशी संबंधित प्रकरण असल्याने प्रीतीचा व्हिडीओग्राफीद्वारे जबाब नोंदवण्यात आला होता. या वक्तव्याच्या आधारे भरत शाह यांना अटक करण्यात आली होती तर, निर्माते नाझिम रिझवी यांनाही या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.

यासंबंधित प्रीतीने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी त्यावेळी खूप घाबरले होते आणि अस्वस्थ होते. त्यावेळी मी चित्रपट निर्माते नाझिम रिझवी यांना भेटले. त्यांनी मला डॉन छोटा शकिल यांचा संपर्क देत सांगितले की, सर्व काही ठिक होईल.

काही समस्या असतील तर त्याला संपर्क कर. प्रीतीच्या या प्रकरणामुळे सर्वच बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठी डोके दुखी झाली होती. सोबतच तिने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वांनीच कौतुक केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT