Priyanka Chopra's Daughter: प्रियांका चोप्राने शेअर केली मुलगी मालतीची पहिली झलक

प्रियांकाने मालती व्हिडिओच सर्वांसोबत शेअर केला आहे.
Priyanka Chopra's Daughter
Priyanka Chopra's DaughterInstagram @priyankachopra

Priyanka Chopra Reveals Daughter's Face: अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणार प्रियांका आता परदेशात रमली आहे. पती निक आणि मुलगी मालती मेरीसोबत प्रियांका या सुखी आयुष्य जगत आहे.

प्रियांकाची मुलगी मालतीचा जेव्हा जन्म झाला तेव्हापासून तिच्या विषयी सगळ्यांना कुतूहल आहे. प्रियंकाने जाणीवपूर्वक तिचा चेहरा सर्वांपासून लपवला होता. पण एका कार्यक्रमादरम्यान प्रियांका मुलगी मालतीसह उपस्थित राहिली होती. यावेळी मात्र प्रियांकाने मालती व्हिडिओच सर्वांसोबत शेअर केला आहे.

Priyanka Chopra's Daughter
Dhishkyaoon Trailer Out: 'ढिशक्यांव' फायरिंग जोरात, आयुष्याच्या कन्फ्युजनची क्लॅरिटी द्यायला दगडुचा आगामी चित्रपट सज्ज

प्रियंका चोप्राने सोमवारी मुलगी मालती मेरीला पहिल्यांदाच सर्वांसमोर आणले. प्रियांका निक जोनास आणि त्याच्या भावांना मिळालेल्या हॉलीवूड वॉक ऑफ फेम स्टार पुरस्कार सोहळयाला गेली होती. या कार्यक्रमात \मालतीसह जोनास ब्रदर्सच्या देखील सामील होते. क्रीम स्वेटर आणि मॅचिंग शॉर्ट्स घातलेल्या पांढर्‍या टॉपमध्ये मालती सुंदर दिसत होती. तर प्रियंका मालतीला मांडीत घेऊन बसलेली होती.

प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका आणि मालती निक जोनसला चिअर करताना दिसत आहेत. प्रियंकाने यादी सुद्धा मालतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण त्यावेळी तिने मालतीचा चेहरा दाखवला नव्हता.

मालतीला पाहून सर्वजण खूप खुश आहेत. बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत सगळेच मालतीचे कौतुक करत आहेत. तर काहीजण मालती वडील निकसारखी दिसत असल्याचे म्हणत आहेत.

प्रियंकाने काही दिवसांपूर्वी 'ब्रिटिश वोग' या मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या आणि मालतीच्या संपूर्ण प्रवासाविषयी सांगितले होते. मालतीच जन्म झाल्यानंतर त्यांना तिला सांभाळणे कसे कठीण होते, हे सर्व प्रियंकाने शेअर केले होते. तसेच प्रियांका सेरोगेसीचा पर्याय का निवडला याचा सुद्धा तिने खुलासा केला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com