Poonam Pandey Alive Instagram
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey Alive: मृत्यू नव्हे तर पब्लिसिटी स्टंट, निधनाच्या चुकीच्या बातमीनंतर पूनम पांडेला नेटकऱ्यांनी सुनावले

Poonam Pandey Video: अभिनेत्री आणि पूनम पांडे जिवंत आहे. अभिनेत्रीने निधनाची चुकीची बातमी दिल्यामुळे पूनम पांडे सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.

Chetan Bodke

Poonam Pandey Alive

अभिनेत्री आणि पूनम पांडे जिवंत आहे. तिच्या (Poonam Pandey Death News) निधनाची बातमी २ फेब्रुवारी २०२४ रोजी समोर आली होती. त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. पण आता निधनाच्या अफवांना पूनम पांडेने स्वत:च पूर्णविराम दिला आहे. अभिनेत्रीने गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने निधनाची पोस्ट शेअर केली असल्याचे माहिती पोस्टमध्ये दिली. त्यामुळे पूनम पांडे सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.

अभिनेत्रीने तिची स्वत:ची व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. अनेकांनी तिच्या ह्या पब्लिसिटी स्टंटवर नाराजी व्यक्त केली आहे. एक युजर म्हणतो, "पूनम पांडे जिवंत आहे. तुला जनजागृती करायची होती, तर तू मोहीम राबवायला हवी होती. तू स्वतःलाच का मृत घोषित केलंस? जागरूकता पसरवण्याचं हे घाणेरडं उदाहरण आहे.'

तर आणखी एक युजर म्हणतो, 'गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणे फार महत्वाचं आहे. पण जागरूकता निर्माण करण्यासाठी दिलेलं धक्कादायक उदाहरण आहे. चुकीची जागरूकता केल्यामुळे विश्वसार्हता गमावल्याची भावना निर्माण झाली आहे.'

तर आणखी युजर म्हणतो, ' पूनम पांडे तु खूप चुकीची वागली आहेस. एखाद्या चांगल्या कारणासाठी मृत्यूसारखी संवेदनशील गोष्टीचा वापर करणे खूप चुकीची गोष्ट आहे.', 'आतापर्यंतचा सर्वात वाईट हा पब्लिसिटी स्टंट होता.', 'एखाद्या गोष्टीचा प्रचार करण्याचा हा सर्वात हास्यास्पद मार्ग होता...', 'पुढच्या वेळी लोकं तुला जास्त गांभीर्याने घेणार नाहीत, तु चाहत्यांची विश्वसार्हता गमावली आहेस.' तर अनेकांनी पोलिसांकडे तिच्या अटकेचीही मागणी केली आहे.

पूनम पांडे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे. पूनम पांडे सोशल मीडियावर अनेकदा आपल्या स्टायलिश व्हिडीओ आणि फोटोमुळे चर्चेत राहायची. 'नशा' चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण तिला बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यात यश मिळाले नाही. इन्स्टाग्रामवर तिचे १.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP Merger: पुणे जिल्ह्यात विलिनीकरणाचं पहिलं पाऊल; अतुल बेनके-अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय, जुन्नरमध्ये घडलं, आता राज्यात कधी?

Sunetra Pawar: दु:खातून सावरल्या, कामाला लागल्या; सुनेत्रा पवारांच्या पाठबळामुळे कार्यकर्त्यांना धीर

वर्गमित्राच्या खोलीत सापडला ३ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या MBA विद्यार्थिनीचा निर्वस्त्र मृतदेह; व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

शरद पवारांकडून दादांच्या नेतृत्वाला मान्यता? शशिकांत शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट, VIDEO

मंत्रालयाला लाचखोरीचा विळखा; झिरवाळांच्या दालनात ACB चा छापा, VIDEO

SCROLL FOR NEXT