मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचं २ फेब्रुवारी रोजी कॅन्सरने निधन झाले, असं वृत प्रसारमाध्यमांमधून धडकलं. यामुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली. अनेकांनी पूनम पांडेला श्रद्धांजली देखील वाहिली. मात्र, आता पूनम पांडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नवा व्हिडीओ शेअर करत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. मी अजूनही जिवंत आहे. असं पूनम पांडेने व्हिडीओत म्हटलं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पूनम पांडे हिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला असून सोबतच एक पोस्ट देखील लिहली आहे. यात ती म्हणते, "तुमच्या सर्वांसोबत काहीतरी महत्त्वाचे शेअर करायला मी समोर आली आहे. - मी इथे आहे, जिवंत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाने माझा मृत्यू झाला नाही, परंतु दुर्दैवाने, या रोगाचा सामना कसा करावा याबद्दल अनेकांना ज्ञान नाही". (Latest Marathi News)
"त्यामुळे ज्ञानाच्या अभावामुळे हजारो महिलांचे प्राण गेले आहेत. इतर काही कर्करोगांप्रमाणे, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. मुख्य गोष्ट HPV लस आणि लवकर तपासणी चाचण्यांमध्ये आहे. या आजारामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही याची खात्री करण्याचे साधन आमच्याकडे आहे", असं पूनम पांडेने (Poonam Pandey) म्हटलं.
आपल्या पोस्टमध्ये पूनम पांडे म्हणते, "गंभीर जागरुकतेने एकमेकांना सशक्त करूया आणि प्रत्येक स्त्रीला घ्यायच्या पावलांची माहिती दिली जाईल याची खात्री करूया. काय करता येईल याचा सखोल अभ्यास करण्यासाठी बायोमधील लिंकला भेट द्या. चला एकत्रितपणे, रोगाच्या विनाशकारी प्रभावाचा अंत करण्यासाठी आणि आणण्यासाठी प्रयत्न करूया".
दरम्यान, पूनम पांडेचं निधन झालं अशी माहिती तिच्या सोशल मीडिया मॅनेजरने दिली होती. याचदरम्यान, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन केलं होतं. पूनमच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलिवूड जगतात मोठं वादळ उठलं होतं. अनेकांनी भावनिक पोस्ट करत पूनम पांडेला श्रद्धांजली देखील वाहिली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.