Neena Gupta Shoot First Kising Scene Saam Tv
मनोरंजन बातम्या

Neena Gupta Experience: “मी डेटॉलने गुळण्या केल्या...” नीना गुप्ता यांनी शेअर केला पहिल्या किसिंग सीनचा अनुभव

Chetan Bodke

Neena Gupta Shared Experience First Kissing Scene: आधी पंचायत वेबसीरिजमुळे तर आता ‘लस्ट स्टोरी २’ मुळे नीना गुप्ता कमालीच्या चर्चेत आल्या आहेत. नीना या एक अशा अभिनेत्री आहेत ज्या व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिल्या आहेत. कोणतीही भूमिका असो अगदी लिलया पार पाडणाऱ्या नीना गुप्ता यावेळी मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने एकदा किसिंग सीन्स झाल्यानंतर डेटॉलने चुळ भरली होती.

‘लस्ट स्टोरी २’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले होते की, लिप-टू-लिप किसिंग सीननंतर नीना यांच्या मनावर इतका परिणाम झाला होता की त्यांनी चक्क डेटॉलने चूळ भरली होती. १९९० च्या सुरुवातीला जेव्हा ‘दिल्लगी’ या शोमध्ये काम करत असतानाची ही ती घटना आहे.

एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ताने पहिल्या किसिंग सीनबद्दल सांगितले आहे. नीता गुप्ता म्हणतात, “माझा पहिला किसिंग सीनचा अनुभव फारच वाईट होता. किसिंग सीन झाल्यानंतर मी रात्रभर झोपू शकले नव्हते. मला फार अस्वस्थ जाणवत होते.”

“माझा पहिला किसींग सीन अभिनेता दिलीप धवनसोबत केला होता. इंडियन टेलिव्हिजनवरील इतिहासात तो पहिला ऑन कॅमेरा किसिंग सीन असल्याची जाहिरात त्यांनी केली होती. दिलीप माझे मित्र नव्हते, पण आमची फक्त ओळखत होती.”

“दिसायला सुद्धा हँडसम होते, पण अशा परिस्थितीत ही गोष्ट महत्त्वाची नाही. कारण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मी तयार नव्हते. मी खूप चिंतेत होते, पण अखेर स्वत:ला समजावलं की मला यातून जायचंच आहे.”

त्यानंतर पुढे नीना गुप्ता म्हणते, “काही जण टेलिव्हिजनसमोर कॉमेडी करू शकत नाही, काही जण रडू शकत नाहीत, तशीच काहीशी ही देखील गोष्ट आहे. तो सीन पूर्ण होताच मी डेटॉलने चूळ भरली होती. त्या व्यक्तीला मी व्यवस्थित ओळखत नाही, त्याला किस करताना माझ्यासाठी खूप कठीण होतं.”

“चॅनलकडून या सीनचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली होती. अखेर त्यांना तो सीन काढून टाकावा लागला होता. मी उत्सवमध्येही इंटिमेट सीन दिला होता. तो देखील माझ्यासाठी खूप कठीण होता.”

‘लस्ट स्टोरी २’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत अमृता सुभाष, अंगद बेदी, काजोल देवगण, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, तिलोत्तमा शोम आणि विजय वर्मा आहेत. येत्या २९ जून रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘लस्ट स्टोरीज २’ प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT