महमूद अली यांची बहिण बॉलिवूड अभिनेत्री मीनू मुमताज यांचे कॅनडामध्ये निधन Saam Tv
मनोरंजन बातम्या

महमूद अली यांची बहिण बॉलिवूड अभिनेत्री मीनू मुमताज यांचे कॅनडामध्ये निधन

बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते मेहमूद यांची बहिण अभिनेत्री मीनू मुमताज यांचे कॅनडामध्ये निधन झाले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते मेहमूद यांची बहिण अभिनेत्री मीनू मुमताज यांचे कॅनडामध्ये निधन झाले आहे. त्या ७९ वर्षांचे होते. मीनू मुमताज मागील काही वर्षांपासून कॅनडा या ठिकाणी वास्तव्यास होते. तसेच त्या आजारी देखील होते. मीनू मुमताज यांचे लहान भाऊ आणि सिनेनिर्माता अनवर अली यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

हे देखील पहा-

तसेच मीनू मुमताज यांच्यावर प्रेक्षकांनी जे भरभरून प्रेम केले त्याबद्दल अनवर अली यांनी आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, 'सिनेमा जगत, प्रसारमाध्यमे, चाहते आणि मित्रमंडळींनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार.' अनवर अली यांची पत्नी यांनी देखील सांगितले की, मीनू जवळपास २० वर्षांपासून कॅनडामध्ये राहत होती. मागील काही वर्षांपासून त्या आजारी होते.

भारतीय वेळेनुसार त्यांचे १.३० वाजेच्या सुमारास निधन झाले आहे. त्यांच्यावर टोरंटोमध्येच अंत्यविधी करण्यात येणार आहे. मीनू मुमताज यांनी 'सखी हातिम' या सिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांनी अनेक सिनेमांत डान्सर म्हणून देखील काम केले होते. सीआयडी, नया दौर, ताजमहल, गबन, जमीर हे त्यांनी काम केलेले सिनेमे लोकप्रिय ठरलेले होते.

मीनू मुमताज यांच्या निधनाविषयी त्यांचे भाचे नौषाद यांनी देखील सांगितले की, ' आतापर्यंत मी बघितलेल्या सर्वात प्रेमळ व्यक्ती होते.' मीनू मुमताज यांचे खरे नाव मलिकुन्निसा होते. परंतु, मीना कुमारी यांनी त्यांना मीनू हे नाव दिले होते. मीनू यांनी मोठे भाऊ महमूद यांच्याप्रमाणे सिनेमांत काम करून स्वतःची वेगळे स्थान निर्माण केले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT