Malaika Arora Spain Photos  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malaika Arora Spain Photos : वयाच्या पन्नाशीतही मलायका अरोरा दिसतेय चिरतरूण, स्पेनमधील फोटोंनी चाहत्यांना केलं घायाळ

Malaika Arora Fitness : मलायका अरोरा सध्या, परदेशवारी करीत आहे. मलायका सध्या स्पेनवारी करते. स्पेनमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडची फिटनेस फ्रिक अभिनेत्री मलायका अरोराच्या फॅशनचा फार मोठा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्रीने आज पन्नाशी गाठली असली तरीही तिच्या फॅशनची आणि फिटनेसची तितकीच जोरदार चर्चा होत असते. अनेकदा ती इन्स्टाग्रामवर योगा करताना, जिम करताना व्हिडिओ शेअर करत असते. अशातच पुन्हा एकदा ती चर्चेत आलीये तिच्या फिटनेसमुळे. मलायका अरोरा सध्या, परदेशवारी करीत आहे. मलायका सध्या स्पेनवारी करते. स्पेनमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे.

मलायका अरोरा स्पेनमध्ये एकटीच सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. अनेकदा अर्जुन कपूरसोबत परदेशात धमाल करणारी मलायका अरोरा पहिल्यांदाच परदेशामध्ये एकटी ट्रीप एन्जॉय करते. काही तासांपूर्वीच मलायकाने स्पेनमधील काही खास फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केले आहेत. स्टोरीतील फोटोंमध्ये अभिनेत्रीचा सुपरहॉट लूक पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक नेटकऱ्यांकडून केले जात आहे. फोटोमध्ये, मलायकाने ग्रीन टू पीस आणि ब्लॅक गॉगल अशा लूकमध्ये ती दिसते. यामध्ये ती तिची कर्वी फिगर फ्लाँट करते.

पुन्हा एकदा सोशल मीडियावर मलायकाच्या फिटनेसची जोरदार चर्चा होत आहे. मलायका अरोरा हिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडलेले दिसत आहेत. मलायका स्पेनमध्ये सुट्टीचा आनंद लुटत असून अर्जुन भारतात अनंत- राधिका यांच्या लग्नामध्ये धम्माल मस्ती करताना दिसतोय. तो त्याच्या बहिणीसोबत लग्नामध्ये पोहोचला होता. मलायका आणि अर्जुन अनेकदा दोघांमधील वयामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती. अर्जुनच्या एका क्रिप्टिक पोस्टमुळे त्यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black & White : 'खालिद का शिवाजी' चित्रपटावर सरकारनं बंदी का आणली? दिगदर्शकाचा मोठा खुलासा

PMC News : बदलीसाठी आयुक्त यांच्यावर दबाव टाकणं भोवलं? पुणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी निलंबित

मंगळवारी उघडणार भाग्याचं कुलूप! सूर्य-चंद्र आणि बुधाची कमाल; 'या' भाग्यवान राशींना मिळणार बंपर पैसा

Ind vs Eng : पहिल्या वनडे सामन्यासाठी आदल्या दिवशीच प्लेइंग ११ ची घोषणा; आश्चर्याचा धक्का देणारा निर्णय

Maharashtra News Live Update: एफडीएचे धाड सत्र सुरूच! पुणे विभागात ३७ लाखांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त

SCROLL FOR NEXT