Malaika Arora Birthday SAAM TV
मनोरंजन बातम्या

Malaika Arora Birthday : मलायका अरोराचा जलवा! एका आयटम साँगने मिळाली ओळख, रातोरात बनली स्टार

Malaika Arora : मलायका ही नेहमीच तिच्या लूक आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. आपल्या डान्समुळे मलायकाने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Shreya Maskar

आपल्या सौंदर्याने आणि फिटनेसमुळे अनेकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मलायका अरोराचा (Malaika Arora ) आज (23 ऑक्टोबर) वाढदिवस आहे. मलायका आता 51 वर्षांची झाली आहे. तिने आपल्या फिटनेसने चाहत्यांना भुरळ पाडली आहे.

मलायका अरोरा ही अभिनयासोबतच डान्ससाठी ओळखली जाते. मलायका अरोराने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहे. तसेच तिने अनेक हिट गाण्यांवर डान्स देखील केला आहे. अनेक गाणी फक्त तिच्या डान्समुळे सुपरहिट ठरली आहेत. तिचा अंदाज चाहत्यांना नेहमी घायाळ करतो. बॉलिवूडमध्ये तिची ओळख 'आयटम गर्ल' अशी आहे. तिने अनेक आयटम साँग केले आहेत. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल से' या शाहरुख खानच्या चित्रपटात तिने एक भन्नाट आयटम साँग केलं आहे. तिने या चित्रपटात 'छैया छैया' या गाण्यावर डान्स केला आहे. या गाण्यामुळे मलायका अरोरा रातोरात स्टार बनली. ती प्रसिद्धीच्या झोकात आली. मलायका आता अनेक डान्स रिअ‍ॅलिटी शोची जज देखील आहे.

बॉलिवूडची अभिनेत्री मलायका अरोराने आपल्या करिअरची सुरुवात व्हिडीओ जॉकी म्हणून केली. मलायकाने मॉडेलिंगमध्ये देखील आपले नाव कमावले आहे. तिने अनेक मॉडेलिंग शो देखील जज केले आहेत.

वयाच्या 25 व्या वर्षी मलायका अरोराने सलमान खानच्या भावाशी म्हणजे अरबाज खानसोबत 1998 मध्ये लग्न केल. त्यांना अरहान खान हा मुलगा आहे. त्यानंतर 2017 ला मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. लग्नाच्या 19 वर्षांनंतर ते विभक्त झाले. अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर मलायका अर्जून कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT