Malaika Arora Post: मलायकाची अर्जुनसाठी साखरेहूनही गोड पोस्ट, म्हणाली...

Malaika Arora Post On Arjun Kapoor Birthday: बॉलिवूडची मुन्नी गर्ल मलायका अरोराने अर्जुन कपूरच्या वाढदिवसाबद्दल खास पोस्ट शेअर केली आहे.
Malaika Arora Post On Arjun Kapoor Birthday
Malaika Arora Post On Arjun Kapoor BirthdayInstagram
Published On

Malaika Arora Post In Arjun Kapoor Birthday: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या वाढदिवसामुळे चर्चेत आहे. अर्जुन कपूर आज त्याचा ३८वा वाढदिवस साजरा करतोय. सध्या सोशल मीडियावर अर्जुन कपूरच्या प्री- बर्थडे पार्टीतील काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी बर्थडे पार्टीला काही सेलिब्रिटींसह त्यांचे मित्रमंडळी देखील उपस्थित होते. नुकतंच बॉलिवूडची मुन्नी गर्ल मलायका अरोराने अर्जुन कपूरच्या वाढदिवसाबद्दल खास पोस्ट शेअर केली आहे.

Malaika Arora Post On Arjun Kapoor Birthday
Malaika Arora Share Arjun Kapoor Photo: मलायकाने फोटो काढताच उशीने झाकलं अर्जुनने अंग; न्युड फोटो व्हायरल

नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलायका म्हणते, “हॅप्पी बर्थडे माय सनशाईन, माय थिंकर, माय गुफी, माय शॉपहॉलिक, माय हँडसम अर्जुन कपूर...” अशी पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये अर्जुनचे हटके स्टाईलमधील फोटो असून तिने शेअर केलेल्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

अर्जुन कपूर आणि गर्लफ्रेंड मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असतात. यातच अर्जुन कपूरच्या बर्थ डे पार्टीमध्ये मलायकाने केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी रात्री अर्जुन कपूरच्या घरी त्याच्या प्री बर्थ डे पार्टीचं आयोजन केले होते. या पार्टीला त्याची गर्लफ्रेंड मलायका, बहीण अंशुला कपूर आणि खुशी कपूर उपस्थित होत्या. या बर्थ डे पार्टीतील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बर्थ डे पार्टीमधील मलायकाच्या डान्सने मात्र सर्वांचंच लक्ष वेधले आहे.

Malaika Arora Post On Arjun Kapoor Birthday
Arjun Kapoor Birthday Party Video: अर्जुन कपूरच्या बर्थ डे पार्टीत मलायकाचा बेभान डान्स; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...

मलायकाचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पार्टीला मलायकाने पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला आहे. त्यावर लाल रंगाचे हर्ट शेपचे दिल आहे. व्हिडिओत मलायका तिच्याच 'छैया छैया' गाण्यावर डान्स करत आहे. मलायका अगदी बेभान होऊन डान्स करताना दिसत आहे.

अर्जुन कपूरच्या या बर्थ डे पार्टीत बहिण अंशुला कपूर आणि खुशी कपूरही होत्या.यावेळी अंशुलाचा बॉयफ्रेंडही पार्टीला उपस्थित होता. या पार्टीचे काही फोटोस त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com