Madhuri Dixit Dance On Gulabi Sadi Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Madhuri Dixit: 'गुलाबी साडी आणि…' गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स पाहिला का?; VIDEO व्हायरल

Madhuri Dixit Dance On Gulabi Sadi Song: नुकताच माधुरीने एक नवीन डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. मराठी सुपरहिट गाणं 'गुलाबी साडी आणि…' यावर माधुरीने सुंदर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Priya More

Madhuri Dixit Dance Video:

बॉलिवूडची (Bollywood) 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सोशल मीडियावर खूपच चर्चेत असते. सध्या कोणत्याही चित्रपटामध्ये दिसत नसली तरी देखील माधुरी दीक्षितचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. माधुरी दीक्षितच्या नवनवीन फोटो आणि व्हिडीओची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. माधुरी दीक्षित नेहमीच ट्रेंडिग रील्सचे डान्स व्हिडीओ शेअर करत असते. अशामध्ये नुकताच माधुरीने एक नवीन डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. मराठी सुपरहिट गाणं 'गुलाबी साडी आणि…' यावर माधुरीने सुंदर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

माधुरी दीक्षितने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटरव 'गुलाबी साडी आणि…' या गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत माधुरीने कॅप्शनमध्ये 'राजा फोटो माझा काढ' असं लिहिलं आहे. माधुरीने या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. तिच्या डान्स स्टेपने तर चाहत्यांचे मन जिंकले. या व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षित खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, माधुरी दीक्षितने लाल रंगाची डिझायनर इंडोवेस्टर्न लेहेंगा परिधान केला आहे. मोकळे केस, लाइट मेकअप, हेवी इअररिंग्स, गळ्यात सुंदर नेकलेस आणि गॉगल लावून माधुरीने लूक परिपूर्ण केला आहे. माधुरीच्या या डान्स व्हिडीओला आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. याला २० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत डान्सचे कौतुक केले आहे. माधुरीने मराठी गाण्यावर आणि प्रेक्षकांच्या सर्वात जास्त आवडत्या गाण्यावर डान्स केल्याने तिचे चाहते चांगलेच आनंदी झाले आहेत.

माधुरीने शेअर केलेला हा व्हिडीओ सर्वांना चांगलाच आवडत आहे. अशामध्ये हे गाणं जिच्यावर चित्रित करण्यात आले आहे त्या प्राजक्ता घागनेने या व्हिडीओवर कमेंट्स केली आहे. प्राजक्ताने कमेंट्समध्ये लिहिले की, 'अइंग...माझ्या आवडत्या व्यक्तीने माझ्या गाण्यावर डान्स केला. मला रडू येतंय...आय लव्ह यू माधुरी मॅम' दरम्यान, 'गुलाबी साडी आणि…' हे गाणं सध्या चांगलेच हिट ठरले आहे. हे गाणं संजू राठोड याने गायलं आहे. तर प्राजक्ता घागने या गाण्यामध्ये डान्स केला आहे. हे गाणं सध्या युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aids: किती पार्टनर्ससोबत शारीरिक संबंध ठेवल्याने एड्सचा धोका संभावतो?

Maharashtra Politics: देवेंद्र पावले, नाहीतर रामराजे नाईक जेलमध्ये गेले असते; जयकुमार गोरेंचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update : चिखलदऱ्यात वनविभागाद्वारे पॅरोमोटरिंग सुरू

Indian Army : भारतीय सैन्याचा ड्रोन हल्ला! बड्या दहशतवादी नेत्याचा खात्मा, १९ जण जखमी झाल्याचा दावा

Liquor Price Hike : लोक रस्त्यावर दारु प्यायला बसतील, त्यामुळे...; उत्पादन शुल्कवाढीवर मद्यप्रेमींकडून मोठी भीती व्यक्त

SCROLL FOR NEXT