बॉलिवूडची (Bollywood) 'ड्रामा क्वीन' राखी सावंतच्या (Rakhi Sawant) पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानी (Aadil Khan Durrani) 'बिग बॉस 12'ची स्पर्धक सोमी खानसोबत नुकताच गुपचूप लग्न केले. आदिल आणि सोमीच्या निकाहचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आदिलने दुसऱ्या लग्नानंतर राखी सावंतला धक्का बसला होता. राखी सावंतने आदिलच्या दुसऱ्या लग्नांतर प्रश्न उपस्थित केला होता की, घटस्फोटाशिवाय त्याने दुसरं लग्न कसे केले. राखी सावंतच्या या प्रश्नावर आता आदिलने उत्तर दिलं आहे. दुसऱ्या लग्नानंतर आदिलने मौन सोडत सर्वांना पडलेल्या प्रश्नाची उत्तरं दिली आहेत.
आदिल खान दुर्रानीने सांगितले की, राखी सावंतसोबतचं माझं लग्न अवैध आहे. यामागचे कारण स्पष्ट करताना आदिलने राखी सावंतचे आधीच कोणाशी तरी लग्न झाल्याचा दावा त्याने केला आहे. याप्रकरणी न्यायालयात खटलाही सुरू असल्याचे देखील त्याने सांगितले. यासोबतच आदिल दुर्राणीने सोमीसोबतचे दुसरे लग्न योग्य ठरवले आणि आपण काहीही चुकीचे केले नसल्याचा दावा केला आहे.
आदिल खान दुर्रानीने ETimes ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न येत आहे की मी पुन्हा लग्न कसे केले? अलहमदुलिल्लाह, मला पुन्हा लग्न करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी मुस्लिम आहे आणि मी लग्न करू शकतो. घरच्यांच्या उपस्थितीत माझा निकाह झाला. मी गुपचूप लग्न केलेले नाही. मी माझ्या घरच्यांशिवाय, एखाद्या बंद खोलीत लग्न केलेले नाही. हे सर्व माझ्या आणि सोमी खानच्या कुटुंबीयांच्या संमतीने झाले आहे. मी रिसेप्शनही केले आहे. ऑफिशियल लग्नानंतर मी माझी पत्नी सोमीसोबत फिरत आहे.'
यासोबतच आदिल दुर्रानीने यांनी राखी सावंतवर नकारात्मकता पसरवल्याचा आरोपही केला आहे. तो म्हणाला की, 'मी चांगल्या आयुष्यासाठी पात्र आहे. राखी सावंत नेहमी नकारात्मकता पसरवायची आणि ती कोणालाही आनंद देऊ शकत नाही. मी तिच्यासारखा नाही. मला आनंद वाटायला आवडतो आणि सोमीने माझ्या आयुष्यात आनंद आणला आहे. मी तिच्यासोबत माझे आनंदी आणि शांत जीवन जगत आहे.'
आदिल दुर्रानीने 7 मार्च रोजी सोमी खानसोबत लग्नाची घोषणा केली होती आणि लग्नाचे फोटो शेअर केले होते. सोमी खान 'बिग बॉस 12'ची स्पर्धक आहे. जी तिची बहीण सबा खानसोबत शोमध्ये आली होती. आदिलने यापूर्वी राखी सावंतसोबत लग्न केले होते. मात्र, गेल्या वर्षी राखीने आदिलवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप केल्याने दोघेही वेगळे झाले होते. यानंतर पोलिसांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी आदिलला अटक केली. 5 महिने तुरुंगात राहिल्यानंतर आदिलची सुटका झाली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.