बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
लारा दत्ताने अक्षय कुमारसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
लारा दत्ताने आपल्या करिअरची सुरुवात अक्षय कुमारच्या चित्रपटातून केली.
बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता सध्या चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्री लवकरच रणबीर कपूरच्या 'रामायण' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशात आता लारा दत्ताने अक्षय कुमारसोबत काम केल्याचा एका किस्सा सांगितला आहे. २३ वर्षांपूर्वा अक्षय कुमारसोबत लारा दत्ता आणि प्रियांका चोप्राने एका चित्रपटात काम केले होते. हे तिघे 'अंदाज' या चित्रपटात झळकले. तेव्हा लारा दत्ता आणि प्रियांका चोप्रा इंडस्ट्रीत नवीन होत्या.
अलिकडेच एका मिडिया मुलाखतीत लारा दत्ताने अक्षय कुमारसोबतच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले. 'एटीएनकॅनडा'शी बोलताना, लारा दत्ताने अक्षय कुमारच्या तिच्याप्रती असलेल्या प्रोटेक्टिव्ह वृत्तीचे वर्णन केले. तसेच अक्षय कुमारने तिला आणि प्रियांका चोप्राला त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात कसे मार्गदर्शन केले याबद्दल सांगितले.
लारा दत्ता म्हणाली, "मी खूप भाग्यवान आहे, की माझ्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात 'अंदाज'सारख्या चित्रपटाने झाली. मला फक्त असं वातावरण हवं होतं, जिथे तुम्हाला पूर्णपणे सुरक्षित वाटेल. तुमचं कोणत्याही प्रकारे शोषण होणार नाही आणि तुमच्या आजूबाजूचे लोक तुमची काळजी घेतील. अक्षय माझा मित्र, गुरू आणि मार्गदर्शक राहिला आहे. त्या काळात, त्याची भूमिका एका सह-कलाकारापेक्षा खूप वेगळी होती. "
लारा पुढे म्हणाली, "प्रियांका आणि मी दोघीही एकाच वेळी इंडस्ट्रीत पदार्पण करत होतो. त्याने दोन तरुण मुलींना डोळ्यात थोडी आशा घेऊन, कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय किंवा दिशेशिवाय येताना पाहिलं. तरीही, त्याने कधीही त्याचा गैरफायदा घेतला नाही...अक्षय कुमारने या इंडस्ट्रीत आता मोठे नाव कमावले आहे. त्याला या इंडस्ट्रीतील बारकावे इतके माहीत आहेत, जसे त्याला त्याच्या तळहातावरील रेषा माहीत असतात. काय चालतं आणि काय नाही, हे त्याला अचूकपणे माहीत आहे... यामुळे, मला एक खूप मजबूत पाया मिळाला, ज्यावरून मी सहजपणे पुढे जाऊ शकले."
'अंदाज' चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. राज कंवर दिग्दर्शित 'अंदाज' या चित्रपटात लारा दत्ताने काजल, प्रियांका चोप्राने जिया आणि अक्षय कुमारने राज यांची भूमिका साकारली होती. लारा दत्ता लवकरच नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या चित्रपटात दिसणार असून या चित्रपटात ती राजा दशरथाची पत्नी कैकेयीच्या भूमिकेत झळकणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.