Kiara Advani Look  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kiara Adwani Bridal Look: लग्नाआधीच कियाराचा लूक व्हायरल, व्हिडिओ पाहून चाहत्यांनी केले ट्रोल

कियाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लग्नाच्या काही तास आधी हा व्हिडिओ समोर आला आहे.

Chetan Bodke

Kiara Adwani Bridal Look Trolled: बॉलिवूड स्टार कपल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी ७ फेब्रुवारीला अर्थात आज लग्नगाठ बांधणार आहेत. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये त्यांच्या लग्नाची सध्या जोरात तयारी सुरु असून लग्नास्थळावर दिग्गज पाहुणे मंडळीनी उपस्थिती लावण्यासही सुरुवात केली. संगीत, मेहंदी समारंभाचे फोटोही बरेच व्हायरल होत आहेत. या सगळ्यांमध्ये कियाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लग्नाच्या काही तास आधी हा व्हिडिओ समोर आला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत कियारा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत असून फोटोशूट करताना दिसत आहे. मात्र, हा व्हायरल झालेला व्हिडिओ कियाराच्या लग्नातील नसून नेटकरी या व्हिडिओमागील सत्य जाणून घेण्यासाठी बरेच उत्साही आहेत. या व्हिडिओमध्ये कियारा अडवाणी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत असून कियारा नववधूच्या लूकमध्ये दिसत आहे. त्यावेळी तिच्या हातात कलिरा आणि मेहंदी दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ तिच्या लग्नाचा नसून, एका जाहिराती संबंधित जुना व्हिडिओ आहे.

कियाराचा हा लूक पाहून नेटकरी बरेच बुचकळ्यात पडले आहे. हा व्हिडिओ कियाराच्या लग्नातील असल्याचे नेटकऱ्यांना वाटत आहे. युजर्सने तिच्या लूकवर कमेंट करत म्हणतात, 'कितीही मेकअप केला तरी नवरीची चमक येत नाही', तर आणखी एक युजर म्हणतो, 'नवरीचा लूक बेकार आहे.' तर दुसरा युजर म्हणतो, 'हा एका शूटचा व्हिडिओ आहे, कारण तिचे अजून लग्न झालेले नाही.'

सिद्धार्थ आणि कियारा ७ फेब्रुवारीला अर्थात आज सप्तपदी घेणार आहे. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये त्यांचे लग्न होणार असून 5 फेब्रुवारीपासूनच पाहुण्यांची लगबग सुरु आहे. करण जोहरपासून शाहिद कपूरपर्यंत सूर्यगड पॅलेसमध्ये पोहोचले आहेत. सर्व पाहुण्यांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे. या लग्नात जवळपास 150 पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

SCROLL FOR NEXT