Karisma Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Karisma Kapoor : 'वो मत डालना...' आत्येभावाच्या रोक्याला पोझ देताना करिश्मा कपूरचा पाय घसरला अन् पडता पडता वाचली, पाहा VIDEO

Karisma Kapoor Viral Video : आदर जैनच्या रोक्याल जाताना बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर पडता पडता वाचली. नेमकं त्या वेळी काय घडलं पाहा.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. करिश्मा कपूरचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नुकताच मुंबईत करिश्मा कपूरच्या आत्येभावाचा रोका पार पडला. तिच्या चुलत भावाचा रोका समारंभ शनिवारी संध्याकाळी पार पडला. आदर जैनचा रोका खूप धुमधडाक्यात पार पडला. या समारंभाला कपूर कुटुंब स्पॉट झाले. करिश्मा कपूरने देखील या समारंभाला हजेरी लावली. तिने समारंभासाठी खास काळ्या आणि सोनेरी रंगाचा एथनिक सूट परिधान केला होता. यात ती खूपच सुंदर दिसत होती.

काकू रीमा जैन यांच्या घराबाहेर कारमधून उतरताना करिश्मा पडता पडता वाचली तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने चुकीच्या पद्धतीने पाऊल टाकल्यामुळे हा छोटा अपघात घडला. ती वेगाने चालताना तिचा तोल गेला आणि स्वतःला सांभाळताना ती स्पॉट झाली. त्यानंतर तिला पकडण्यासाठी हात पुढे आले.

थोडे सावरल्यावर करिश्माने सुंदर पोझ देखील दिली. पुढे ती गंमतीने पापाराझींना विनंती करताना दिसली. ती म्हणाली की,"वो मत डालना अभी" असे म्हणून हा व्हिडीओ शेअर करू नका असे ती म्हणाली. करिश्माच्या या व्हायरल होणार्‍या व्हिडीओ काही नेटकरी काळजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. तर काहीजण करिश्माची खिल्ली उडवत आहेत.

आदर जैनने आलेखा अडवाणी सोबत लग्नगाठ बांधणार आहे. आदर जैन आणि आलेखा अडवाणी यांचा सप्टेंबर महिन्यात साखरपुडा पार पडला. या सोहळ्याला रणबीर कपूर आणि आई नीतू कपूर हे एकत्र स्पॉट झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT