Kangana Ranaut
Kangana Ranaut Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: कंगना रणौतने इनस्टाग्रामबाबत केलं खळबळजनक वक्तव्य; म्हणाली, 'मुर्ख...'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kangana Ranaut: कंगना रणौत आपल्या अभिनयासोबतच तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी चर्चेत असते. तिला सर्वचजण बिंधास्त वागण्या- बोलण्यासाठी ओळखतात. कंगनाच्या मनाला जे विचार पटतात ते विचार सोशल मीडियावर शेअर करत असते.

कंगना सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते. २०२१ मध्ये सर्वाधिक कंगनाने ट्विटरचा वापर केला होता. ट्विटरच्या माध्यमातून बऱ्याच मुद्द्यांविरोधात आपले परखड मत मांडले होते. त्यामुळे २०२१ मध्ये कंगनाचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते.

तिचे ते अकाऊंट पुन्हा सुरु होण्याची शक्यता असताना तेच तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून इन्स्टाग्रामला टीकेचे धनी केले आहे. मत व्यक्त करताना कोणतीही गोष्टीची तमा न बाळगता ती आपले परखड मत मांडते. ट्विटर अकाऊंट बंद असताना परखड मत मांडण्यासाठी आता इन्स्टाग्रामची निवड केली आहे.

ट्विटर कंपनीचा ताबा एलन मस्क यांच्याकडे गेला असून त्यामुळे आता कंगनाचं अकाऊंट सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिचे अकाऊंट सुरु होण्याची चर्चा चांगलीच रंगली होती.

Kangana Post

इन्स्टाग्रामबाबत काही खळबळजनक वक्तव्य कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवरुन केले आहे. त्यात कंगना म्हणते, "मूर्ख इन्स्टाग्राम हे फक्त फोटोंसाठीचं अ‍ॅप आहे. इन्स्टाग्राम स्टोरीत मांडलेली मते दुसऱ्या दिवशी निघून जातात. जणू काही येथील प्रत्येक व्यक्ती अस्थिर, चंचल, गांभीर्य नसलेला मूर्ख माणूस आहे. त्यांना इतरांनी मांडलेली मतं दुसऱ्या दिवशी जाणून घेण्यात रस नसल्याचं इन्स्टाग्रामला वाटतं. पण आमच्यासारख्या व्यक्तींचं काय ज्यांना सगळं जाणून घ्यायचं असतं."

सोबतच ती पुढे म्हणते, "आपण मांडलेल्या मतं जपून ठेवायची असतात. अभ्यासू वृत्तीच्या व्यक्ती नेहमीच संवाद साधतात. एका विशिष्ट विषय किंवा परिस्थितीचा अर्थ लावण्याचा आणि त्या वृद्धिंगत करण्याचा त्यांचा हेतू असतो."

अद्यापतरी कंगनाचे ट्विटर अकाऊंट चालू होणार की नाही, यासंदर्भात अधिकृतरित्या माहिती मिळालेली नाही. पण ट्विटर सुरु होण्या आधीच तिने इन्स्टाग्रामसोबत पंगा घेतला आहे. हा पंगा आता तिला महागात पडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shikhar Bank Scam: शिखर बँक घोटाळ्याची SIT चौकशी करा, मुंबई हायकोर्टात याचिका; अजित पवारांच्या अडचणी वाढणार?

Jalna Lok Sabha: भाजप नेत्यांचा आज राज्यात सभांचा धुराळा; दानवेंच्या प्रचारार्थ अमित शाह जालन्यात

Business Idea: फक्त ५० हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय; दरमहा होईल बक्कळ कमाई

Bus Fire News: ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग, कर्मचाऱ्यांनी उड्या मारून वाचवला जीव; खळबळजनक घटना

Mumbai News: चिकन शोर्मा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT