ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांचा चित्रपट RRR 2022 मधील सर्वाधिक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीवर ९०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. जगभरात चित्रपटाने जवळपास ११०० कोटी रुपयांपेक्षा अधिकची कमाई केली होती. चित्रपटाने हिंदी भाषेत २५० कोटी इतकी कमाई केली असून आरआरआर चित्रपटाने अनेक बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत अटके पार झेंडा रोवलेत.
दिग्दर्शक एसएस राजामौली यांना 'बाहूबली' च्या सीरिजनंतर आणखी एका चित्रपटाच्या घवघवीत यशाची अपेक्षा होती. त्यांनी आरआरआर चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. मोठ्या पडद्यावर आरआरआर चा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर, चित्रपटाच्या अनेक चाहत्यांची इच्छा होती की, राजामौली ने सिक्वेल बनवून कथा पुढे न्यावी.
त्याच चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी म्हणता येईल. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांचा उर्जेने भरलेला चित्रपट पुन्हा पडद्यावर पाहण्याची इच्छा प्रत्येक चाहत्याला असते. आरआरआरची ऑस्कर मोहीम सुरू झाली आहे असून राजामौली आजकाल जगभरातील त्यांच्या चित्रपटाशी संबंधित कार्यक्रमांचा भाग बनत आहे. अलीकडे, शिकागो येथे आयोजित एका कार्यक्रमात राजामौली यांनी RRR 2 शी संबंधित एक मोठे अपडेट शेअर केले आहे.
आपल्या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याबाबत राजामौली म्हणाले, 'माझे वडील माझ्या सर्व चित्रपटांचे कथाकार आहेत. आम्ही याबद्दल थोडी चर्चा केली आहे आणि ते कथेवर काम करत आहेत. राजामौली यांचे वडील केव्ही विजयेंद्र प्रसाद यांनी 'ईगा' 'बाहुबली' 'मगधीरा' आणि 'आरआरआर' सारखे चित्रपट लिहिले आहेत आणि त्यांचे नाव देशातील सर्वात मोठ्या सिनेमा लेखकांमध्ये घेतले जाते.
आता जर त्याने RRR 2 च्या कथेवर काम सुरू केले असेल तर चाहत्यांसाठी यापेक्षा चांगली गुड न्युज असू शकत नाही. दोन्ही अभिनेत्यांनाही काही काळ आधी सिक्वेल बनवायचा होता, एका संभाषणात अभिनेते राम चरण आणि ज्युनियर एनटीआर म्हणतात, त्यांनाही आरआरआर 2 साठी पडद्यावर पुन्हा एकत्र काम करायला आवडेल.
इव्हेंटबद्दल बोलताना ज्युनियर एनटीआर म्हणाला होता, 'राजामौली सरांना RRR 2 बनवावे लागेल. या कथेचा परिणाम असावा. मी आज दिवसभरात कोणाशी तरी याबद्दल बोलत होतो मी बोलता- बोलतो बोलून गेलो की, RRR ही एक फ्रेंचाइजी आहे. माझे शब्द खरे ठरतील अशी आशा आहे. आता राजामौलीच्या सिक्वेलची पुष्टी केल्यानंतर, त्या दिवशी ज्युनियर एनटीआरच्या जिभेत खरोखरच काही दैवी शक्ती होती असे दिसते. मात्र ही बातमी येताच त्यांनाच नाही. उलट जगभरात पसरलेल्या RRR चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.