Mere Husband Ki Biwi: 'माझ्या नवऱ्याची बायको'चा बॉलिवूडमध्ये रिमेक, 'आता मालिका नाही येणार...'

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ आहे की, मराठी मालिकेतील विषय बॉलिवूड चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे.
Majhya Navryachi Bayko
Majhya Navryachi BaykoSaam Tv

Mere Husband Ki Biwi : झी मराठीवरील काही वर्षांपूर्वी सर्वाधिक गाजलेल्या 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने सर्वांचेच निखळ मनोरंजन केले होते. या मालिकेतील सर्वाधिक चर्चेत पात्र होते, गुरु, राधिका आणि शनयाचे. या मालिकेत हे पात्र अभिजित खांडेकर, अनिता दाते आणि रसिका सुनिलने यांनी साकारले होते.

या मालिकेने सर्वच वयोगटातील प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत १००० हून अधिक भाग पूर्ण केले होते. या मालिकेत गुरुचे शनयासोबतचे विवाहबाह्य संबंध दाखवण्यात आले असून काल्पनिक, मनोरंजन आणि तितक्याच हलक्या फुलक्या पद्धतीने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात आले होते.

Majhya Navryachi Bayko
Apurva Nemlekar: अपूर्वा प्रियकराच्या शोधात; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टची चर्चा

या मालिकेची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ आहे की, मालिकेतील विषय आता चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. मराठी मालिकेतील विषय बॉलिवूड चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे. सोबतच मालिकेसारखे नाव चित्रपटाला ही देण्यात आले आहे. या चित्रपटाचे नाव 'मेरे हसबंड की बीवी' असे आहे.

मालिकेचा विषय पाहता चित्रपटाचा जॉनरही विनोदी असण्याची शक्यता आहे. चित्रपटाची कथा मालिकेपेक्षा काहीशी वेगळी आहे. परंतू या चित्रपटातही गुरुसारखा बायको आणि गर्लफ्रेंड या दोघींच्या टोमण्यांनी पिचलेला अभिनेता दाखवला आहे.

Majhya Navryachi Bayko
Shahrukh Khan: काल एअरपोर्टवर शाहरुख सोबत नक्की काय घडलं? वाचा सविस्तर...

गेल्या अनेक दिवसापासून लंडनमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरु आहे. चित्रीकरणादरम्यान चित्रपटाचे नाव ठरवण्यात आले नव्हते, पण आता चित्रपटाचे नाव सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटात मुख्य भूमिकेत अर्जुन कपूर, रकुल प्रित सिंग आणि भूमी पेडणेकर एकत्र दिसणार आहेत.

Majhya Navryachi Bayko
Tujhyat Jeev Rangala : अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधव हिचं कोल्हापूरात अपघाती निधन; आठवड्याभरापूर्वीच साजरा केला होता वाढदिवस

लवकरच चित्रपटाची सर्व शूटिंगही पूर्ण करण्यात येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अझीझ करणार असून विष्णू आणि जॅकी भगनानी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा चित्रपट २०२३ या आगामी वर्षात प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com