Rockey Aur Rani Ki Prem Kahani: करण ७ वर्षानंतर सिनेसृष्टीत करणार पदार्पण, आलियाला ही चित्रपटाची उत्सुकता

आलियाने गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर तिचा एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' असे आहे.
Rockey Aur Rani Ki Prem Kahani
Rockey Aur Rani Ki Prem Kahani Twitter/ @DharmaMovies

Rockey Aur Rani Ki Prem Kahani : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात तिने गोंडस मुलीला जन्म दिला. गोंडस मुलीच्या येण्याने कपूर आणि भट्ट कुटुंबीय खूपच आनंदीत दिसून येत आहे. आलियाच्या गोंडस लेकीची चर्चा चाहत्यांसह सोशल मीडियावरही बरीच होत आहे. गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनंतर आलिया रुग्णालयातून घरी परतली आहे. पुढचे काही दिवस ती घरात आराम करणार असल्याचे सांगितले जात आहे. या काळात रणबीर त्याच्या कामावर लक्षकेंद्रित करणार आहे.

Rockey Aur Rani Ki Prem Kahani
Mere Husband Ki Biwi: 'माझ्या नवऱ्याची बायको'चा बॉलिवूडमध्ये रिमेक, 'आता मालिका नाही येणार...'

गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर आलियाचा एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' असे आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

हा कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट पुढील वर्षी एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. करण जोहरने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेची रिलीज डेट जाहीर करणारी पोस्ट शेअर केली आहे.

Rockey Aur Rani Ki Prem Kahani
Apurva Nemlekar: अपूर्वा प्रियकराच्या शोधात; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टची चर्चा

करणने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची तारीख जाहीर करताना एक पोस्ट शेअर केली आहे, त्यामध्ये तो सांगतो की, ७ वर्षांनंतर पुनरागमन करण्यासाठी तो खूप उत्सुक आहे. या पोस्टमध्ये करणने लिहिले की, “७ वर्षांनंतर चित्रपटगृहांमध्ये परतायची वेळ आली आहे.

माझ्या सातव्या चित्रपटाच्या सेटवर मला एकापेक्षा एक दर्जेदार कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली. या चित्रपटाची कथा आपल्या कौटुंबिक परंपरा यांच्या खोलवर जाऊन भिडते आणि त्याचे संगीत लोकांच्या हृदयाला स्पर्श करेल.

त्या पोस्टमध्ये पुढे लिहीले की, हीच वेळ आहे तुमच्या कुटुंबासोबत फिरण्याची, मोठ्या पडद्यावर प्रेम, मनोरंजन पाहण्याची. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या रिलीजची तारीख जाहीर करताना आम्ही खूप उत्सुक आहोत. हा चित्रपट पुढील वर्षी 28 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Rockey Aur Rani Ki Prem Kahani
Shahrukh Khan: काल एअरपोर्टवर शाहरुख सोबत नक्की काय घडलं? वाचा सविस्तर...

करण जोहर दिग्दर्शित हा चित्रपट याआधी व्हॅलेंटाईन वीक म्हणजेच १० फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, परंतु विविध कारणांमुळे निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. आता पुन्हा एकदा त्याच्या चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com