Chandramukhi 2 Hindi Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chandramukhi 2 Hindi Trailer: 'चंद्रमुखी 2'चा हिंदी ट्रेलर पाहिलात का?, कंगनाच्या रौद्रावताराने वेधलं साऱ्याचं लक्ष

Chandramukhi 2 Movie: या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यामधील कंगनाचा रौद्रावतार पाहून साऱ्यांना चकीत केले आहे.

Priya More

Kangana Ranaut Movie:

बॉलिवूडची (Bollywood) 'कॉन्ट्रव्हर्सी क्वीन' कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) तिच्या आगामी 'चंद्रमुखी २' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून खळबळ उडवून देण्यासाठी कंगना सज्ज झाली आहे. तिच्या या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. तिचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशामध्ये या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यामधील कंगनाचा रौद्रावतार पाहून साऱ्यांना चकीत केले आहे.

चंद्रमुखी २ चित्रपट तमिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला हिंदी ट्रेलर खूपच जबरदस्त आहे. जो पाहून चित्रपट कधी रिलीज होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा चंद्रमुखीचा रौद्रावतार पाहायला मिळणार आहे.

'चंद्रमुखी 2' च्या हिंदी ट्रेलरमध्ये एक माणूस पहिल्यांदा एका कुटुंबाला 17 वर्षांपूर्वीची चंद्रमुखीची गोष्ट सांगताना दिसत आहे. या ट्रेलरमध्ये कंगना रनौतची फक्त एक झलक दाखवण्यात आली आहे. यानंतर राघव लॉरेन्स अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. जो चंद्रमुखीपासून कुटुंबाला वाचवेल. या ट्रेलरमध्ये कंगना राजा वेट्टयानच्या दरबारात डान्सरच्या भूमिकेत दिसत आहे.

ट्रेलरमधील कंगनाच्या रौद्ररुपाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चंद्रमुखी आणि वेट्टैयन आमने-सामने आल्यानंतर पुढे नेमकं काय होणार हे चित्रपट पाहिल्यानंतर समोर येईल. हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी आहे. कंगनाने 'चंद्रमुखी 2' मधील तिच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. यासाठी कंगना भारतीय शास्त्रीय नृत्य देखील शिकली आहे. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर पाहिल्यानंतर आता प्रेक्षक चित्रपटाची वाट बघत आहेत.

दरम्यान, २००५ मध्ये 'चंद्रमुखी' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्याचा रिमेकही हिंदीत 'भूल भुलैया' नावाने तयार करण्यात आला होता. जो सर्वांना खूप आवडला होता. पण, आता 'चंद्रमुखी 2' या साऊथ चित्रपटाचा सिक्वेल तयार झाला असून तो 28 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. आधी हा चित्रपट 15 सप्टेंबरला रिलीज होणार होता. पण 'जवान' चित्रपटामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता तो 'फुक्रे 3' सोबत रिलीज होणार असून दोन्ही चित्रपटांमध्ये टक्कर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BOI Recruitment: खुशखबर! बँक ऑफ इंडियात नोकरी अन् १.२० लाख रुपये पगार; अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय? वाचा

Haldi Kunku Gift Idea : बेस्ट हळदी–कुंक वाण आयडिया, उपयोगी आणि बजेटमध्ये बसणाऱ्या खास वस्तू

Leopard News : बिबट्या अकोल्यात पोहचला, बाळापूरमध्ये ४ पिल्लांसह आढळला, एक शेतकर्‍याच्या हाती लागले, पण...

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

SCROLL FOR NEXT