Kangana Ranaut : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतने डेटिंग अॅप्सबद्दल तिचे स्पष्ट मत मांडले आहे. एका मुलाखतीत तिने डेटिंग अॅप्सना 'गटर' म्हटले आणि या डेटिंग अॅप्स चांगले लोक सापडत नाहीत असे देखील मत मांडले. एवढेच नाही तर, कंगना असेही म्हणाली की ती अशा अॅप्स वापरणाऱ्या लोकांपासून दूर राहते.
'प्रत्येकाला गरजा असतात'
मुलाखतीदरम्यान कंगनाला विचारले की, 'जेन-झी मुळे तू कधी डेटिंग अॅप्स वापरण्याचा प्रयत्न केला आहेस का?', तेव्हा तिने उत्तर दिले, "नाही बाबा. ते एक गटर आहे. प्रत्येकाच्या गरजा असतात. सर्व प्रकारच्या गरजा. एक माणूस म्हणून, तुमच्या आर्थिक गरजा असतात, शारीरिक गरजा असतात आणि प्रत्येकाच्या स्वतःच्या गरजा असतात. आता त्या कशा पूर्ण करायच्या चांगल्या आणि समजूतदारपणे, की उघडपणे आणि अश्लीलपणे? म्हणजे, तुम्हाला डेटिंग अॅपमुळे दररोज रात्री काहीतरी शोधण्यासाठी बाहेर जावे लागते का?" मला हे पटत नाही.
कल्पनाही करू शकत नाही'
कंगना पुढे म्हणाली, "डेटिंग अॅप्स असे म्हणत आहेत, दररोज रात्री बाहेर जाऊन एखाद्याला शोध. हे काय आहे? म्हणजे मी अशाप्रकारे ओळखी निर्माण करणाऱ्या किंवा ठरवून लोकांना भेटणाऱ्यांच्या संपर्कात येण्याची कल्पनाही करू शकत नाही."
चांगल्या पार्टनरची गरज असेल तर
अभिनेत्री पुढे म्हणाली, "बघा, तुम्हाला डेटिंग अॅप्सवर आमच्यासारखे लोक सापडणार नाहीत. तिथे तुम्हाला असे लोक सापडतील जे स्वत: आयुष्यात फार निगेटिव्ह आहेत किंवा ज्यांनी आयुष्यात काहीही साध्य केलेले नाही. पण, जर तुम्हाला एका चांगल्या पार्टनरची गरज असेल तर तो तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी, पालकांद्वारे किंवा कॉलेजमध्ये नक्कीचं सापडेल पण अशी डेटिंग अॅप्सवर नाही. मला वाटते की जर तुम्ही अशा अॅप्सवर जात असाल तर तुमचा वेळ वाया होईल."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.