Jaya Bachchan Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jaya Bachchan Angry Video: ‘मी बहिरी नाही, मला व्यवस्थित...’ पापाराझींवर संतापल्या जया बच्चन; व्हिडीओ व्हायरल

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Special Screening Viral Video: सोशल मीडियावर चित्रपटाच्या प्रीमियरवेळी झालेल्या रेड कार्पेटवरील एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये अभिनेत्री जया बच्चन फोटोग्राफर्सवर चांगल्याच भडकलेल्या दिसत आहेत.

Chetan Bodke

Jaya Bachchan Viral Video: येत्या २८ जुलैला करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ प्रदर्शित होणार आहे. आलिया- रणवीरसोबत चित्रपटात बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटाच्या टीमने सर्वत्र जोरदार चित्रपटाचं प्रमोशन केलं आहे. नुकताच चित्रपटाचा प्रीमियर पार पडला. प्रीमियरला यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि इंडस्ट्रीतील संबंधित लोकं यावेळी उपस्थित होते.

नुकताच सोशल मीडियावर चित्रपटाच्या प्रीमियरवेळी झालेल्या रेड कार्पेटवरील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) फोटोग्राफर्सवर चांगल्याच भडकलेल्या दिसत आहेत.

जया बच्चन यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या प्रीमियरला त्यांच्यासोबत मुलगा अभिषेक बच्चनदेखील आला होता. जया बच्चन यांना बाहेर उभे असलेल्या पापाराझींनी त्यांच्या नावाचा जयघोष केला. फोटोसाठी पापाराझी वारंवार जया बच्चन यांचं नाव घेत होते. त्यामुळे पापाराझींवर चिडलेल्या जया बच्चन म्हणतात, ‘मी बहिरी नाही’ असं रागात त्या म्हणाल्या.

सध्या सोशल मीडियावर जया बच्चन यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत, चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान जया बच्चन अभिषेकची गेटवर वाट पाहत होत्या. यावेळी सर्वच पापाराझी जया बच्चन यांना फोटोसाठी पोज देण्याकरीता विनंती तरत होते. यानंतर जया बच्चन यांना राग आला, रागाच्या भरात जया बच्चन म्हणाल्या, ‘मी बहिरी नाही, मी व्यवस्थित ऐकू शकते.’ असं म्हणत त्या आणि अभिषेक पुढे निघून जातात.

चित्रपटाबद्दल बोलायचे तर, हा चित्रपट येत्या २८ जुलैला प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर करत आहे, तर चित्रपटात मुख्य भूमिकेत आलिया भट्ट आणि रणवीर सिंहसोबत जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी, क्षिती जोग हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. कौटुंबिक नाट्य, रोमान्स, डान्स असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakshabandhan 2025: रक्षाबंधनात ओवाळणीच्या ताटात कोणत्या गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते?

ITBP Bus Accident: धक्कादायक! जवानांची बस नदीत कोसळली, क्षणात झालं होत्याचं नव्हतं|VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपूर वरून परत ठेऊन संत गजानन महाराज यांची पालखी शेवटच्या टप्प्यात पोहोचली

Parbhani Crime : परभणीत खळबळ; मध्यवस्तीत आढळला महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

Shocking News: नूडल्स खाणाऱ्यांनो सावधान! पाकिटामध्ये आढळली मेलेली पाल; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT