Jacqueline Fernandez Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jacqueline Fernandez: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मनी लाँड्रिंग प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अखेर जॅकलिनला पटियाला कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून तिला कोठडीत ठेवण्याची गरज नाही, या आधारावर जॅकलिनला कोर्टातून जामीन मिळाला आहे. सोबतच या प्रकरणातील आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.

200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात जॅकलिनला जामिनासाठी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी देण्यात आलेले सर्व नियम आणि अटींचे तिला पालन करणे अनिवार्य असणार आहे. जॅकलिन फर्नांडिसच्या जामिनाची मुदत 10 नोव्हेंबर रोजी संपली. परंतू न्यायालयाने 11 नोव्हेंबर रोजी तिच्या जामिनाचा निर्णय रोखून ठेवला होता. मात्र आता जॅकलिनला मोठा दिलासा मिळाला आहे. जॅकलिची दोन लाखांच्या शॉरिटी बॉन्डवर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

जॅकलिनला जामीन मिळाल्यास ती श्रीलंकेला पळून जाऊ शकते, असे ईडीने न्यायालयाला सांगितले आहे. सोबतच पुढे जॅकलिनवर असे आरोप करण्यात आले होते की, आरोपी जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखर ठग असल्याची माहिती होती.

तरीही तिने त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू घेणे सुरूच ठेवले. जॅकलीन फर्नांडिसच्या वकिलाने कोर्टात बचाव करताना ईडीचे आरोप सर्व फेटाळले होते. ते म्हणाले होते की, जॅकलिनने नेहमीच तपासात सहकार्य केले आहे. उलट ईडीने नेहमीच जॅकलिनला त्रास देत खोटे आरोप केले आहे.

दरम्यान, गेल्या बऱ्याच दिवसांपासून महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखरला 200 कोटी गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली असून या प्रकरणात अनेक बॉलिवूडच्या कलाकारांच्या नावांची यादी समोर आली होती.

याप्रकरणात जॅकलिनचे नाव अग्रस्थानी होते. त्यामुळे दिवसेंदिवस तिच्या अडचणींमध्ये फारच वाढ होत गेली. पण आता पटियाला हाऊस कोर्टाकडून जॅकलीनला मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box Office Collection: कांताराची दिवाळीत बंपर कमाई; लवकरच पार करणार ६०० कोटींचा टप्पा

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त

Sai Tamhankar Photos: खोल गळ्याच्या ब्लाऊजमध्ये सईचं खुललं सौंदर्य, फोटो तुम्हालाही आवडतील

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT