
Sara Ali Khan-Shubman Gill Latest News: क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्स यांच्यातील प्रेमप्रकरण ही नवीन गोष्ट नाही. भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे याचे जिवंत उदाहरण आहेत. सध्या बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान आणि युवा क्रिकेटर शुभमन गिल यांच्यात भेटी वाढत आहेत. सारा अली खान शुभमन गिलला डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले आहेत. आता या बातम्यांबाबत क्रिकेटर शुभमन गिलची प्रतिक्रिया समोर आली आहे.
शुभमन गिलला 'दिल दिया गल्ला' या लोकप्रिय पंजाबी चॅट शोमध्ये पाहुणा म्हणून बोलवण्यात आले होते. सोनम बाजवा हा शो होस्ट करते. प्रश्नोत्तरादरम्यान शुभमन गिलला विचारण्यात आले की, बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेत्री कोण आहे? या प्रश्नाच्या उत्तर देताना शुभमनने क्षणाचाही विलंब न करता सारा अली खानचे नाव घेतले. पुढच्या प्रश्नात शुभमनला विचारण्यात आले की, तो साराला डेट करत आहे का? यावर शुभमनने 'कदाचित' असे उत्तर दिले. यानंतर, जेव्हा शोच्या होस्टने संपूर्ण सत्य सांगण्यास सांगितले, तेव्हा शुभमनने हसून 'सारा दा सारा सच बोल दिया' असे उत्तर दिले. (TV)
शुभमन गिलचे उत्तर ऐकून दोघांमध्ये काय चालले आहे याचा अंदाज सगळ्यांनाच आला असेल. जरी शुभमन उघडपणे 'हो' म्हटले नसेल तरी त्याने ते नाकारले नाही. सारा आणि शुभमन यांच्या प्रेम प्रकरणाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून समोर येत आहेत. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. नुकतेच एका फ्लाइटमध्ये सारा आणि शुभमन यांनाही एकत्र पाहण्यात आले होते. यापूर्वी दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले होते. (Sport)
शुभमन गिलला डेट करण्याबाबत साराकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दोघेही त्यांच्या अफेअरला कधी सर्वांसमोर आणतील याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी सारा अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करत होती. दोघांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. त्याचवेळी 'कॉफी विथ करण' या टॉक शोमध्ये सारा-कार्तिकच्या अफेअरची चर्चा झाली होती. पण आता दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. (Sara Ali Khan)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.