भारताबाहेर निघालेल्या जॅकलीनच्या अडचणीत वाढ; ईडीने मुंबई विमानतळावर रोखलं Saam Tv
मनोरंजन बातम्या

भारताबाहेर निघालेल्या जॅकलीनच्या अडचणीत वाढ; ईडीने मुंबई विमानतळावर रोखलं

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी आता वाढले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी आता वाढले आहेत. तिच्याविरोधामध्ये लूकआऊट नोटीस काढण्यात आली आहे. रविवारी यामुळे जॅकलिनला मुंबई विमानतळावर रोखण्यात आले आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणामध्ये सक्तवसुली संचलनालयाने (ED) 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी ईडीने लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. जॅकलिन दुबईकडे एका कार्यक्रमाकरिता जात होती. यावेळी तिची चौकशी करण्यात आली आहे.

तसेच दिल्लीमध्ये तपास यंत्रणेसमोर हजर राहावे लागणार आहे, असे सांगण्यात आले आहे. दिल्लीमधील कार्यालयात हजर होण्यासाठी ईडी नव्याने जॅकिलनला समन्स जारी करण्यात येणार आहे. ईडीने सुकेश चंद्रशेखर आणि इतरांविरोधामध्ये 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी 7000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तिहार जेलमध्ये असताना त्याने एका उद्योजकाच्या पत्नीकडून 200 कोटींची वसूली केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

या आरोपपत्राच्या दाव्यानुसार, 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे सापडले आहेत. यावेळी जॅकलिन सुकेशला डेट करत होती, असेही सांगितले जात आहे. त्यांचा 1 फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलिनला 52 लाख रुपये किंमतीचा घोडा भेट म्हणून देण्यात आला होता. तर 9 लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट देखील देण्यात आली होती. Bollywood actress Jacqueline Fernandes was intercepted Mumbai airport

जॅकलिनबरोबर या आरोपपत्रात अभिनेत्री नोरा फतेहीचा देखील उल्लेख केला जात आहे. सुकेशने नोराला खूप महागडी कार भेट म्हणून दिली होती. या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने याअगोदर दोन्ही अभिनेत्रींची चौकशी केली आहे. या अगोदर नोरा फतेहीच्या प्रतिनिधीने ती एक पीडित असल्याचा दावा करण्यात आला होता.

नोरा फतेही तपासात सहकार्य करत असल्याचे सांगताना त्यांनी सांगितले होते की, नोरा आरोपीला ओळखत नव्हती किंवा तिचे त्याच्याशी काही संबंधही नाही. तपासात सहकार्य करण्यासाठी तिला बोलावण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुती आणि मविआला हादरा; राज्यात नव्या आघाडीची नांदी, कुणाला फायदा अन् फटका?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी, बँकेबाहेर दिसल्या भल्यामोठ्या रांगा

Nandurbar : चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; नेसू नदीवर पूल नसल्याने पुरातून काढावा लागतो मार्ग

Maharashtra Live News Update : मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस

Political News : मराठी माणसांना भडकावून मते मिळवणे हाच ठाकरेंचा उद्देश; शिंदे गटाची आगपाखड

SCROLL FOR NEXT