लोकप्रियतेमुळे नव्हे तर निष्ठावंतांमुळे तुम्ही खासदार; कोल्हेंना आ.मोहितेंचा घरचा आहेर!

स्वतःच्या लोकप्रियतेमुळे नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान, प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या कष्टाने तुम्ही खासदार झाला आहात याचे भान असुद्या, असा थेट इशारा शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी दिला आहे.
लोकप्रियतेमुळे नव्हे तर निष्ठावंतांमुळे तुम्ही खासदार; कोल्हेंना आ.मोहितेंचा घरचा आहेर!
लोकप्रियतेमुळे नव्हे तर निष्ठावंतांमुळे तुम्ही खासदार; कोल्हेंना आ.मोहितेंचा घरचा आहेर!SaamTvNews
Published On

खेड : स्वतःच्या लोकप्रियतेमुळे नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान, प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या कष्टाने तुम्ही खासदार झाला आहात याचे भान असुद्या, असा थेट इशारा शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी दिला आहे. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आगामी जिल्हा बँक, दुध संघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी वाकी, संतोषनगर येथील साई कृपा कार्यालयात आयोजित केला होता. यावेळी आमदार मोहिते बोलत होते.

हे देखील पहा :

तालुक्यातील निर्णय घेताना विचारात घेत नाहीत, तालुक्यात परस्पर येऊन कार्यक्रम करता आणि ज्यांनी निवडणूकीत जीवाचं रान करून निवडून आणले त्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या विरोधकांना बरोबर घेता हे बरं नाही. समाजकारण यु ट्यूब, फेसबुकवर पोस्ट टाकण्याऐवढे सोपे नाही. ज्यासाठी तुम्हाला योग्य समजून मते दिली त्या लोकांचे काम करा आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत या! असा थेट पण बोचरा सल्ला राष्ट्रवादीचे खासदार डॉ.कोल्हे यांना आमदार मोहिते यांनी दिला.

लोकप्रियतेमुळे नव्हे तर निष्ठावंतांमुळे तुम्ही खासदार; कोल्हेंना आ.मोहितेंचा घरचा आहेर!
Breaking : माजी आमदार विजय भांबळेंच्या मुलीच्या गाडीने चौघांना उडवलं!

शिरुर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हेंना लक्ष्य केल्यानंतर पुणे जिल्हा दुध संघालाही आमदार दिलीप मोहिते पाटलांनी लक्ष्य केलय. जिल्हा दुध संघाचा सध्याचा अध्यक्ष मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहे. संघातील डांबरट संचालक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्याने सत्ता उपभोगत आहेत. मात्र, पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन दूध उत्पादकांची लुट करीत आहेत. त्यांच्या विरोधात तक्रार केली, त्यात तथ्य आहे. मात्र, महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे सरकार असल्याने कारवाई होऊ शकत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी जिल्हा दूध संघालाही लक्ष्य केलय. त्यामुळे खेड तालुक्यातील राजकारणात पुन्हा एकदात अंतर्गत राजकिय कलह सुरु झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com