Adil Khan
Adil Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Adil Girlfriend Tanu: राखीनेच स्वत: केला खुलासा, कोण आहे आदिलची गर्लफ्रेंड?

Chetan Bodke

Tanu Chandel: सध्या बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान दुर्राणी बरेच चर्चेत आले आहे. राखीने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच तिने त्याच्यासोबत लग्न केल्याचा खुलासा केला होता. पण आता या दोघांच्या वैवाहिक जीवनात काही आलबेल नसल्याच्या चर्चा होत आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत तिने पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगितले होते. नुकतेच राखीने आदिल आणि गर्लफ्रेंड तनुची पोलखोल केली असून तो तिच्या सोबत असल्याचेही सांगितले. त्यामुळे नेमकी ही तनु कोण हे जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक आहे.

नुकतेच राखीने आदिलच्या गर्लफ्रेंडचे नाव तनु असल्याचे सांगितले. राखी बिग बॉस मराठीच्या घरात असल्यापासून त्या दोघांचेही अफेअर सुरु असल्याचे सांगितले. ती नंतर स्पर्धेतून बाहेर आल्यानंतर तिला याबद्दल कळालं. राखीने आदिलला अनेकदा समजावण्याचाही प्रयत्न केला. पण त्याने तिचं काहीच ऐकलं नाही. त्यावेळी राखीची आईही आजारी होती. अखेर राखीने आदिलच्या गर्लफ्रेंडचं नाव जाहीर केलं.

सोशल मीडियावर सध्या तनु आणि आदिलचे फोटोही व्हायरल होत आहेत. राखीच्या म्हणण्यानुसार तनु मूळची इंदौरची आहे. त्या ठिकाणी आदिलचा एक फ्लॅटही आहे. आदिलची इंदौरमध्ये एक बीएमडब्ल्यू कारही आहे. राखीने दिलेल्या माहितीनुसार तनु आयआयटीची विद्यार्थीनी असून एक बिझनेसवूमन आहे. गेल्या ८ वर्षांपासून तनु बॉलिवूडमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी स्ट्रगल करीत आहे. तिने काही प्रोजेक्टमध्येही काम केलं आहे. तिचं सध्या वय ३७ वर्ष आहे.

तनूचे राखीने पूर्ण नाव सांगितलेले नाही, पण व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये तरी, तनूचे पूर्ण नाव तनु चंडेल असल्याचे सांगण्यात येत आहे. तिचे खरे नाव निवेदिता चंडेल आहे. तनुला सोशल मीडियावर आदिल खान दुर्रानी देखील फॉलो करतो. सोबतच तिचे 604k फॉलोअर्स देखील आहेत. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Rally: काँग्रेसकडून सुरू असलेला हिंदू-मुस्लिमचा खेळ केला उघड, PM मोदींचा मोठा दावा

CAA अंतर्गत 14 लोकांना मिळालं भारतीय नागरिकत्व, गृह मंत्रालयाने दिली माहिती

Pune News: पुणे महापालिकेला राष्ट्रीय हरित लवादाचा दणका, १ कोटी ७९ लाखांचा दंड ठोठावला

Hardik Pandya: हार्दिकला भारतीय संघात का घेतलं? समोर आलं मोठं कारण

Manjra Dam : मांजरा धरणात आता १० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा; अनेक भागात मोठ पाणीसंकट

SCROLL FOR NEXT