Hema Malini Traveled By Public Transport Twitter
मनोरंजन बातम्या

Hema Malini Traveled By Public Transport: ट्रॅफिकला कंटाळून ड्रीम गर्लने शोधला जालिम उपाय; खासगी गाडी नाकारत... Video Viral

हेमा मालिनी यांनी मुंबईच्या ट्रॅफिकला कंटाळून त्यावर एक जालीम उपाय केला आहे.

Chetan Bodke

Hema Malini Travelling Viral Video: ट्रॅफिक. कधी ही न संपणारा मुद्दा. अनेक सेलिब्रिटींनी मुंबईच्या ट्रॅफिकला कंटाळत शहर सोडण्याचा विचार केला. एकदा जर त्या ट्रॅफिकमध्ये अडकले की, आपण लवकर त्यातून सुटत नाही. हा मुद्दा सर्वांनाच नेहमी त्रास देतो. असाच त्रास नुकता हेमा मालिनी यांना झाला. हेमा मालिनी यांनी मुंबईच्या ट्रॅफिकला कंटाळत थेट मेट्राचा प्रवास केला.

अनेकदा काही सेलिब्रिटींनी ट्रॅफिकला कंटाळत मेट्रो किंवा रेल्वेचा पर्याय अवलंबला. आपल्या महागड्या गाड्या सोडून मेट्रोसारख्या सार्वजनिक गाड्यांचा पर्याय अवलंबला होता. हेमा मालिनी मंगळवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसल्या. यावेळी चक्क खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री मेट्रोचा प्रवास करत आहे, हे पाहून अचंबित झाले. मुंबईच्या ट्रॅफिकला कंटाळून त्यांनी हा उत्तम पर्याय वापरला असल्याचे सांगितले.

यावेळी हेमा मालिनी यांनी मेट्रोच्या प्रवासाचा अनुभव आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. नुकताच त्यांनी ट्वीटरवर तो अनुभव शेअर केला. यावेळी हेमा मालिनी यांनी गुलाबी रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या ट्राउझर घालत मेट्रो प्रवासाचा आनंद लुटला. मेट्रोमधील आपल्या प्रवासाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत हेमा मालिनी म्हणतात, मला कारमधून दहिसरला जायला दोन तास लागले होते. मी ट्रॅफिकला कंटाळून गाडीने नं जाण्याचा निर्णय घेतला. परत येताना कारऐवजी मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय केला. मेट्रोने प्रवास केल्याने मी फार कमी वेळेत मी माझ्या ठिकाणी पोहोचले.

मेट्रोने प्रवास केल्यानंतर हेमा मालिनी यांनी डी.एन.नगर ते जुहूपर्यंत ऑटोने प्रवास केला. यासंदर्भात हेमा मालिनी यांनी लिहिले की, जेव्हा मी माझ्या घरी ऑटोमधून उतरले त्यावेळी माझ्या सेक्युरिटीला विश्वास बसत नव्हता की, मी रिक्षातून प्रवास केला आहे. अर्थातच हा अनुभव माझ्या साठी फारच खास होता. हेमा मालिनी यांनी रिक्षेत बसूनसुद्धा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जयसिंगपूरमध्ये २४ वी ऊस परिषद पार, १८ ठराव पास

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना मारहाण, शरीराला अनेक फ्रॅक्चर?

BMC Election : महायुतीच्या जागावाटपाआधीच रामदास आठवलेंनी बॉम्ब फोडला; मुंबईतून दोन उमेदवारांची केली घोषणा

Manoj Jaranage: जरांगेंचं आंदोलन ठरलं फुसका बार? तायवाडेंनी केली कुणबी प्रमाणपत्रांची पोलखोल

Ayushman Bharat Yojana: आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोणकोणत्या सेवा मोफत मिळतात?

SCROLL FOR NEXT