Kushal Badrike In Ravrambha
Kushal Badrike In RavrambhaInstagram

Kushal Badrike Post: इच्छा होती महाराजांचा मावळा होण्याची झालो मात्र 'कुरबतखान', कुशल बद्रिकेच्या पोस्टने वेधलं लक्ष

Kushal Badrike New Look: कॉमेडीमध्ये माहीर, अचूक टाईमला विचित्र पंच मारणं आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा कुशल आता लवकरच मोठ्या पडद्यावरून चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

Kushal Badrike In Ravrambha: कॉमेडीमध्ये माहीर, अचूक टाईमला विचित्र पंच मारणं आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा कुशल बद्रिके (Kushal Badrike) सोशल मीडियावर बराच चर्चेत असतो. नेहमीच टेलिव्हिजनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा कुशल आता लवकरच मोठ्या पडद्यावरून चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

लवकरच कुशल ‘रावरंभा’ (Ravrambha) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याने नकारात्मक भूमिका साकारली आहे. त्यामुळे त्याच्या लूकसोबतच चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे.

Kushal Badrike In Ravrambha
Sushmita Sen Heart Attack: सुष्मिताच्या हार्ट ॲटेकचं गुपित उलगडलं; सहकलाकाराने सांगितला शूटिंग दरम्यानचा किस्सा

‘रावरंभा’ (Ravrambha) या ऐतिहासिक सिनेमात कुशल क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ ही भूमिका साकारणार आहे. विनोदी भूमिका साकारताना महाराष्ट्रातील ‘कॉमेडीयन’ म्हणून स्थान मिळवलेल्या कुशलची ही पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका आहे.

महाराष्ट्राच्या कॉमेडी स्टारचा हा पहिलाच ऐतिहासिक सिनेमा असून तो यामध्ये नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. येत्या १२ मे ला या ऐतिहासिक चित्रपटाचे ‘मोरपंखी पान’ प्रेक्षकांना रूपेरी पडद्यावर अनुभवता येणार आहे. अनुप जगदाळे दिग्दर्शित आणि शशिकांत शीला भाऊसाहेब पवार निर्मित ‘रावरंभा’ चित्रपटातील प्रेमकहाणी रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.

Kushal Badrike In Ravrambha
Maharashtra Shaheer Trailer: महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी झटणाऱ्या शाहिर साबळेंच्या आयुष्याची झलक ट्रेलरमधून.. उत्सुकता आणखी शिगेला

कुशलने बहलोलखानचा वफादार आणि शाही सल्तनतीचा राखणदार असलेला ‘कुरबतखान’ हा विजापूरचा क्रूर हेर होता. ‘बघणाऱ्याला चीड येईल अशी ही भूमिका साकारणं हे खरंतर माझ्यातल्या अभिनेत्यासाठी आव्हानात्मक होतं. त्यामुळे दिसण्यातला वेगळेपणा आणि लकबी आत्मसात करून ही भूमिका मी साकारलीय. प्रेक्षकांच्या ती पसंतीस पडेल, अशी मला खात्री आहे.’ अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

त्याने सोशल मीडियावर त्याचा हा लूक शेअर केला आहे. शेअर करताना कुशल म्हणतो, “ खरं तर ऐतिहासिक सिनेमांमध्ये “छत्रपती शिवाजी महाराजांचा” एखादा “मावळा” व्हावं आणि स्वराज्याच्या लढ्यात आपण स्वतःला झोकून द्याव असं प्रत्येक मराठी नटाचं स्वप्न असतं, पण “रावरंभा” ह्या सिनेमात माझ्या नशिबात हा कुरबत खान आला, या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे यांना माझ्यात हा कुरबत दिसला आणि मग नव्या सिनेमाचा प्रवास सुरु झाला. प्रत्येक नवा सिनेमा काहीतरी शिकवून जातो, एक नवीन जीवन, नवीन अनुभव देऊन जातो, मी माझी भूमिका प्रामाणिक पणे करण्याचा प्रयत्न केला पण तरीही इमान महाराजांच्याच पायाशी धाव घेत रहातं.”

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल घराघरांत पोहोचला. कुशलचा ‘पांडू’ हा सिनेमा देखील काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com