Gauahar Khan And Zaid Darbar  Instagram/ @gauaharkhan
मनोरंजन बातम्या

Gauahar Khan: गौहरने दिली चाहत्यांना गुड न्युज, ३९ वर्षात होणार आई; मग चर्चा तर होणारच...

नुकतंच ‘बिग बॉस ७’ची विजेती आणि बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानने एक गोड बातमी देत चाहत्यांना मोठं सरप्राईज दिले आहे.

Chetan Bodke

Gauahar Khan: २०२२ हे वर्ष बॉलिवूडसाठी जितके वादाचे ठरले तेवढेच गुड न्युज देणारे ही ठरले. कोणाच्या घरी सनई- चौघड्यांचे बोल ऐकू आले तर काहींच्या घरात गोंडस बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. या वर्षात अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी आपल्या चाहत्यांना गुड न्युज दिली आहे. त्यात आलिया भट्ट, सोनम कपूर, बिपाशा बासू सोबतच देबिना बॅनर्जी यांचा क्रमांक लागतो. लवकरच आणखी एक सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांना गुड न्युज देणार आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना गुड न्युज दिली आहे.

नुकतंच ‘बिग बॉस ७’ची विजेती आणि बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानने एक गोड बातमी देत चाहत्यांना मोठं सरप्राईज दिले आहे. गौहर खान आणि झैद यांच्या लग्नानंतर लगेच ३ महिन्यात गौहार गरोदर असल्याची सोशल मीडियावर अफवा पसरली होती. यावर ती अफवा पसरवणाऱ्यांवर आणि ट्रोलर्सवर बरीच भडकली होती. 39 वर्षीय गौहर खानने गुड न्युज शेअर करत सोशल मीडियावर एक स्पेशल व्हिडीओसु्द्धा शेअर केला आहे.

अतिशय मजेदार आणि हटक्या पद्धतीतील व्हिडीओ शेअर करत तिने 'गौहर झैद आणि +१' असे सांगत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. गौहर खान आणि झैदने सोशल मीडियावर गुड न्युज शेअर करताच तिला बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटींनी अभिनंदन केले आहे. याबरोबरच “या सुखद प्रवासात तुमच्या आशिर्वादाची गरज आहे” असं लिहीत गौहरने पोस्ट शेअर केली.

२५ डिसेंबर २०२० मध्ये गौहर खान आणि झैद दरबार विवाहबंधनात अडकले. लग्नादरम्यान त्यांना दोघांनाही वयावरुन भरपूर ट्रोल करण्यात आले होते. पण सोशल मीडियावर जैद गौहरपेक्षा १२ वर्षांनी लहान असल्याची चर्चा होत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

SCROLL FOR NEXT