Divya Bharti x
मनोरंजन बातम्या

Bollywood Actress : ती खोलीत आली अन् माझ्या छातीवर.., प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत निर्मात्याचा मोठा खुलासा

Divya Bharti Bollywood Actress : चित्रपटनिर्माते पहलाज निहलानी यांनी पिंकव्हिलाला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान निहलानी यांनी अभिनेत्री दिव्या भारतीशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या.

Yash Shirke

  • सिनेनिर्माते पहलाज निहलानी यांनी पिंकव्हिलाला मुलाखत दिली.

  • पहलाज निहलानी यांनी मुलाखतीदरम्यान दिव्या भारतीचे किस्से सांगितले.

  • दिव्या कामाप्रती किती समर्पित होते हे सांगताना निहलानी यांनी किस्सा शेअर केला.

Divya Bharti Pahlaj Nihalani : नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिव्या भारती. तिच्या सौंदर्याचे लोके वेडे होते. मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करुन तिने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले होते. वयाच्या १९ व्या वर्षी तिचे निधन झाले. तिच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. निर्माते पहलाज निहलानी यांनी दिव्या भारतीसोबत 'शोला और शबनम' या चित्रपटात काम केले होते. पहलाज निहलानी यांनी एका मुलाखतीमध्ये दिव्या भारतीचे काही किस्से सांगितले.

पिंकव्हिलाला पहलाज निहलानी यांनी मुलाखत दिली. दिव्याचा ज्या रात्री मृत्यू झाला, त्याबाबत निहलानी यांनी सांगितले. ते म्हणाले, 'त्या दिवशी रात्री दिव्या एकटी होती. तिथे कोणीही नव्हते. त्यावेळी नेमकं काय झालं हे कोणालाही माहीत नव्हते. तिचे कुटुंबही रुग्णालयात पोहोचले नाही. माहिती समजताच मी लगेच रुग्णालयात पोहोचलो होतो. तिच्या मृत्यूनंतर रुग्णालयात पोहोचणारा मी पहिला व्यक्ती होतो.'

पहलाज निहलानी यांनी दिव्या भारतीच्या कामाचे खूप कौतुक केले. दिव्या कामासाठी किती समर्पित होती याचा किस्सा त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितला. 'एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिव्याच्या पायात खिळा घुसला होता. यामुळे दुसऱ्या दिवसाचे चित्रीकरण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री ३ वाजता पायात खिळा घुसल्यानंतरही ती सकाळी ६ वाजता गाण्याच्या चित्रीकरणासाठी तयार झाली', असे निहलानी म्हणाले.

'दिव्याच्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हा मी तिला विश्रांती घेण्यास सांगितले होते. त्यावेळेस दिव्या माझ्या हॉटेलच्या खोलीत दरवाजा उघडून आत आली आणि माझ्या छातीवर येऊन बसली आणि मला म्हणाली उठ. माझी बायको झोपली होती. ही मुलगी कोण आहे? असे माझ्या बायकोने विचारले होते', असे पहलाज निहलानी यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

भयंकर दुर्घटना! नव्याने बांधलेली इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू,अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंसोबतच्या भेटीचे फोटो समोर

High Blood Pressure : पावसाळ्यात वाढतो हाय BP चा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

चपाती की भाकरी? काय खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते?

SCROLL FOR NEXT