Gunfire outside actress Disha Patani’s house: Gangsters claim responsibility, police probe on. saam tv
मनोरंजन बातम्या

Firing: अभिनेत्री दिशा पटानीच्या घराबाहेर गोळीबार का झाला? धक्कादायक माहिती आली समोर

Actress Disha Patani House Firing: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या घराबाहेर दोन दिवसापूर्वी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्याची जबाबदारी विरेंद्र चारण आणि महेंद्र सारण यांनी घेतलीय.

Bharat Jadhav

  • अभिनेत्री दिशा पटानीच्या घराबाहेर आग्नेयास्त्रातून दोन राउंड हवाई फायरिंग.

  • गोळीबाराची जबाबदारी गँगस्टर विरेंद्र चारण आणि महेंद्र सारण यांनी घेतली.

  • संत प्रेमानंद यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे हल्ल्याचं कारण स्पष्ट.

अभिनेत्री दिशा पटानी हिच्या उत्तर प्रदेशातील घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. या गोळीबार प्रकरणात एक मोठा धक्कादायक खुलासा झालाय. हल्लेखोरांनी गोळीबार का केला होता त्याचे कारण समोर आले आहे. हा गोळीबार संत प्रेमानंद यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे करण्यात आला होता.

गोळीबारीची घटना दोन दिवसापूर्वी पहाटे ४:३० वाजता घडली होती. दोन २ राउंड हवाई गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात कोणालाही इजा झाली नव्हती. दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट करून या गोळीबाराची जबाबदारी एका गँगस्टरनं घेतली होती. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

दिशा पटानीच्या बरेलीतील घरी गोळीबार का झाला?

पोलीस सध्या गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. दिशा पटानीचे संपूर्ण कुटुंब राहते. तिच्या कुटुंबात तिची मोठी बहीण खुशबू पटानी आणि आई-वडील आहेत. ते सर्वजण बरेलीमधील घरात राहतात. खुशबू पटानी सोशल मीडियावर सक्रिय आहे. परंतु त्यांनी याप्ररकरणी कोणतीच पोस्ट केली नाहीये.

दरम्यान दिशा पटानीच्या घरावर कोणी गोळीबार केला होता, याची माहिती सोशल मीडियावरून समोर आली होती. दिशाच्या घरावर गोळीबार वीरेंद्र चरणच्या टोळीने केला होता. त्याने स्वतः या गोळीबाराची जबाबदारी घेतलीय. सोशल मीडियावर पोस्ट करताना त्याने म्हटले होत की, 'सर्व बांधवांना जय श्री राम, राम राम. मी वीरेंद्र चरण, महेंद्र सरन (डेलहाणा) आहे. बंधूंनो, आज दिशा पटानीची बहीण खुशबू पटानीच्या घरी झालेला गोळीबार आम्ही केला आहे.

'त्यांनी आमचे पूज्य संत प्रेमानंद जी महाराज आणि अनिरुद्धाचार्य जी महाराजांचा अपमान केला होता. त्यांनी आपल्या सनातन धर्माला कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता. आमच्या पूज्य देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही.' हा एक ट्रेलर आहे, पण पुढे कोणी आमच्या धर्माविषयी काही वाईट अभद्र वर्तन कोणी केलं तर त्याच्या घरामधील कोणीच जिंवत राहणार नाही, अशी धमकी दिली. 'हा संदेश फक्त या व्यक्तीसाठी नाही तर चित्रपट उद्योगाशी संबंधित सर्व कलाकार आणि लोकांसाठी आहे.

जर भविष्यात कोणी आपल्या धर्म आणि संतांशी संबंधित असे कोणतेही अपमानजनक कृत्य केले तर त्याचे परिणाम भोगण्यास तयार राहा.' आमच्या धर्माचे रक्षण करण्यास आम्ही कोणत्याही पातळीवर जाऊ शकतो. त्यासाठी काहीही करू शकतो. आमच्यासाठी सर्व धर्म एक आहेत, त्यांचे रक्षण करणं आमचं प्रथम कर्तव्य आहे, असं गँगस्टर विरेंद्र चारणने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT