Deepika Padukone  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: दीपिकाला ब्युटी प्रॉडक्ट्सची जाहिरात करणे पडले महागात, नेटकरी म्हणतात, 'हे तर किराण्यापेक्षा... '

दीपिका इंस्टाग्रामवर ब्रँड्सचे काही खास फोटो शेअर करत असते. तिने काही दिवसांपूर्वीच ब्रँडचे फोटो शेअर केले होते. त्यामुळे तिला ट्रोलधाडीचा बराच सामना करावा लागला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Deepika Padukone Trolled In Beauty Products: बॉलिवूडची मस्तानी म्हणून सर्व देशभरात दीपिका पदुकोण (Deepika Padukone) प्रचलित आहे. (Bollywood) तिचे चाहते हे फक्त भारतातच नाही तर जगाभरात आहेत. दीपिका फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूड (Hollywood) मध्येही चर्चित आहे. तिच्या उत्कृष्ट अभिनयाने चाहते बरेच आहेत. दीपिका नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत जोडलेली असते. (Social Media)

दीपिका इंस्टाग्रामवर ब्रँड्सचे काही खास फोटो शेअर करत असते. तिने काही दिवसांपूर्वीच ब्रँडचे फोटो शेअर केले होते. त्यामुळे तिला ट्रोलधाडीचा बराच सामना करावा लागला आहे. त्या ब्रॅंडचं नाव सेल्फ-केअर ब्रँड, 82°E असे आहे.

दीपिकाने 'अश्वगंधा बाउन्स' (Ashwagandha Bounce) मॉइश्चरायझर आणि 'पचौली ग्लो' (Patchouli Glow) सनस्क्रीन विषयी पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. दीपिका भारतीय असली तरी ती अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर आहे. त्यामुळे दीपिका यावेळी ट्रोल झाली आहे.

"माझे स्किनकेअर रूटिन हे रोजच्या जीवनातील अविभाज्य घटक बनले आहे. मी असेच प्रॉडक्स वापरते जे वापरणं सोपे आणि प्रभावी आहे. (skincare Routine) त्यामुळे मी माझ्या ब्रँडच्या पहिल्या दोन गोष्टी या SPF 40 सह अश्वगंधा बाउन्स आणि पॅचौली ग्लो सनस्क्रीन असे मॉइश्चरायझर आणि स्किनकेअर आणले आहेत.' (Deepika Padukone Daily Routine)" दीपिका त्या प्रॉडक्ट लॉन्चवेळी बोलली होती.

सोबतच दीपिका पुढे म्हणते, "आम्ही गेली दोन वर्ष प्रिमियम, हाई परफॉर्मेंस स्किनकेअर प्रोडक्ट्स तयार करण्यात आणि वापरण्यात घालवली आहेत. त्या प्रोडक्ट्सचे पावरफुल साइंटिफिक कंपाउंडसोबत बऱ्याच टेस्ट केल्या आहेत. हे सगळे प्रोडक्ट्स सेन्सेटिव्ह स्किन सोबतच सगळ्याच स्किनला सूट करतात." दीपिकाला नेटकऱ्यांकडून चांगलेच ट्रोल केले जात आहे. तिच्या ट्रोलिंगचे मुख्य कारण म्हणजे त्या प्रॉडक्ट्सची किंमत.

दीपिकाला ब्युटी प्रॉडक्ट्सच्या किंमतीवरुन चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. तिला एक नेटकरी म्हणतो, ' अश्वगंधा आणि सोडियम हायलुरोनेट मॉइश्चरायझरची किंमत 2,700 इतकी आहे तर पॅचौली आणि सिरॅमाइडस असलेली सनस्क्रीन ड्रॉप्सची किंमत 1,800 इतकी आहे. या किमतीत सामान्य व्यक्ती आपला महिनाभराचा रेशन सहज भरू शकतो.'

स्किनकेअरबद्दल माहिती

अश्वगंधा बाउन्स मॉइश्चरायझर हे एक लाइटवेट मॉइश्चरायझर आहे. त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि स्किन इलास्टिसिटीसाठी सगळ्यात चांगले असल्याचे सांगितले जात आहे. पॅचौली ग्लो सनस्क्रीन SPF 40 ब्रॉड स्पेक्ट्रम PA+++ हे पॅचौली लीफ एक्स्ट्रॅक्टला सिरॅमाइड्ससह एकत्र करते ज्यामुळे त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होईल. हे प्रोडक्ट्स स्किनकेअरला सोप बनवण्यासाठी आहे. हे प्रोडक्ट्स वीगन, क्रूल्टी फ्री आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati News : बारामतीचा वाली कोण? अजित पवारांचं मोठं विधान, पाहा Video

Priyanka Gandhi : जातनिहाय जनगणनेसाठी काँग्रेस आक्रमक; प्रियंका गांधींचे PM मोदींना ओपन चॅलेंज

Walnut: दूध की पाणी? अक्रोड कशात भिजवून खाणे जास्त फायदेशीर

Rohit Sharma Son: रोहित शर्माने मुलाचं नाव काय ठेवलं?

Uddhav Thackeray Exclusive: मुख्यमंत्रिपद ते भाजपसोबत युती आणि शिंदेसेना ते राज ठाकरे; उद्धव ठाकरेंची Exclusive मुलाखत

SCROLL FOR NEXT